महाराष्ट्र

ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव यांचे तातडीने निलंबन करावे

या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात चौकशी करून कारवाई करण्यात येईल,तोपर्यंत पदावरून हटवण्यात आल्याची घोषणा मंत्र्यांनी केली

नागपूर: ब्रम्हपुरी पोलिस स्थानकातील उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव हे भ्रष्ट आहेत.अनेक प्रकरणात त्यांच्यावर आरोप झाले असून चौकशी झाली आहे.या अधिकाऱ्याचे तातडीने निलंबन करण्याची मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.

लक्षवेधीच्या माध्यमातून विजय वडेट्टीवार यांनी ब्रह्मपुरी पोलिस स्थानकातील राकेश जाधव हा अत्यंत नियमबाह्य काम करत आहे. रात्री गस्तीवर असताना वाळूने भरलेला ट्रक दहा दिवस पकडून ठेवला. ट्रकमालकाशी आर्थिक देवाणघेवाण झाल्यानंतर गुन्हा न दाखल करता ट्रॅक सोडून दिला.ब्रम्हपुरी मध्ये वाळू तस्करांचा धुमाकुळ सुरू असताना हा पोलिस अधिकारी माज करत माझं कोणी वाकड करू शकत नाही अशा आवेशात कारवाया करत आहे. अशा भ्रष्ट अधिकाऱ्याचे तातडीने निलंबन करावे म्हणून वडेट्टीवार विधानसभेत आक्रमक झाले. गृहराज्यमंत्री कारवाईचे निर्देश देत नसल्यामुळे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार विधानसभेच्या वेलमध्ये जात कारवाईची मागणी केली.

लक्षवेधीच्या उत्तराला गृहराज्यमंत्री यांनी सबंधित पोलिसाविरोधात विभागीय चौकशी सुरू असून अहवाल आल्यावर कारवाई करू असे आश्वासन दिले. यावर विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला. जाधव हे जर त्याच पोलिस स्थानकात कार्यरत राहिले तर चौकशीवर परिणाम करू शकतात म्हणून त्यांना त्या पदावरून हटवण्यात यावे ही मागणी केली. तेव्हा गृहराज्यमंत्री यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव यांना तात्काळ त्यांच्या पदावरून हटवण्यात येईल असे आश्वासन सभागृहात दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

18 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago