महाराष्ट्र

15 वर्षांनंतर कोठडीतील मृत्यू प्रकरणी ऐतिहासिक निकाल; 9 पोलिसांना जन्मठेप

वाशिम: वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने 2011 मधील कोठडीतील मृत्यू प्रकरणात ऐतिहासिक निकाल देत तत्कालीन ठाणेदारासह 9 पोलिसांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.

प्रकरणानुसार, 9 मे 2011 रोजी रिसोड पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे आणि अन्य आठ पोलिसांनी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा येथील पारधी वस्तीवर धाड टाकून बेग्या पवार यांना चोरीच्या गुन्ह्यात संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. गुन्ह्याची कबुली मिळवण्यासाठी त्यांना पोलिस कोठडीत मारहाण करण्यात आली. या मारहाणीत 10 मे 2011 रोजी त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर सीआयडीने 34 दिवस तपास करून संबंधित पोलिसांविरुद्ध खुनाचा तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला होता. तब्बल 15 वर्षे 1 महिना 23 दिवसांनंतर या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळाला आहे.

न्यायालयाने तत्कालीन ठाणेदार महादेव माणिक धांडे यांच्यासह मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारी, पंजाब माणिकराव पाटकर, रमेश सीताराम पवार, प्रकाश हिरालाल तारम, नागोराव भगवान खांडके, अशोक निवृत्ती वैद्य आणि वसंत कणिराम जाधव या नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

बेग्या पवार यांच्या आईने सांगितले की, त्यांच्या मुलावर यापूर्वी कोणताही गुन्हा दाखल नव्हता. केवळ पारधी समाजातील असल्यामुळे त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

निकालानंतर बेग्या पवार यांच्या आई-वडिलांनी न्यायालयाच्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत सीआयडी आणि सरकारी वकील श्रीराम काळू यांचे आभार मानले. हा निकाल सर्वसामान्य नागरिकांनाही न्याय मिळू शकतो, हा विश्वास अधिक दृढ करणारा असल्याची प्रतिक्रिया सरकारी वकील श्रीराम काळू यांनी व्यक्त केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष : अचानक मिळेल शुभ संकेत! आज एखाद्या कामात अनपेक्षितपणे चांगली प्रगती होऊ शकते. तुमच्या…

3 तास ago

हातगाडीपासून महापालिकेच्या महसुलापर्यंत; Street Economy ची ताकद किती मोठी?

मुंबई : भारताची अर्थव्यवस्था केवळ मोठ्या उद्योगांमध्ये, कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये किंवा शेअर बाजारात दिसत नाही. देशाच्या…

3 तास ago

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्राचा दबदबा; तावडेंना सरचिटणीसपद, भारती पवार उपाध्यक्ष

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या नव्या…

19 तास ago

‘राजकारणात आलो आणि माझाच मेंदू खराब झाला’; सुजय विखें

अहिल्यानगर : अहिल्यानगर-मनमाड महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या कामाला…

19 तास ago

लाडकी बहीण विरुद्ध लाडली बहना; रक्षाबंधनानिमित्त कोणत्या राज्यातील महिलांना किती रक्कम?

मुंबई : रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांना दोन महिन्यांचे हप्ते…

19 तास ago

फडणवीसांची अचानक दिल्लीवारी; मोदींची भेट, महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून विविध घडामोडींना वेग आलेला असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

19 तास ago