महाराष्ट्र

कुणबी प्रमाणपत्र कसे काढावे? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप प्रोसेस

औरंगाबाद: कुणबी जात प्रमाणपत्र हे शिक्षण, नोकरी, शिष्यवृत्ती आणि शासकीय योजना यांचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रात कुणबी जात OBC प्रवर्गात मोडते.

ऑनलाइन पद्धत (आपले सरकार पोर्टल)

वेबसाइट: aaplesarkar.mahaonline.gov.in

प्रक्रिया

“नवीन नोंदणी” करा

लॉगिन करून “महसूल विभाग → जात प्रमाणपत्र” निवडा

अर्ज भरून माहिती द्या.

आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

शुल्क भरा.

अर्ज सबमिट करून अर्ज क्रमांक जतन करा.

ऑफलाइन पद्धत (तहसील / सेतू केंद्र)

तहसील / SDM कार्यालय किंवा सेतू केंद्र येथे अर्ज करता येतो.

प्रक्रिया

अर्ज घ्या आणि व्यवस्थित भरा

कागदपत्रे व शपथपत्र जोडा

अर्ज जमा करा व पावती घ्या

तलाठी/अधिकाऱ्यांमार्फत चौकशी

पडताळणीनंतर प्रमाणपत्र मिळवा.

आवश्यक कागदपत्रे

ओळख पुरावा: आधार, पॅन, मतदान कार्ड

रहिवासी पुरावा: रेशन कार्ड, लाईट बिल, ७/१२ उतारा

वयाचा पुरावा: जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला

जात पुरावा (महत्त्वाचा)

वडील/आजोबा यांचे शाळा सोडल्याचे दाखले.

१९६७ पूर्वीचे महसुली नोंदी

जन्म/मृत्यू दाखले

नातेवाईकांचे जात प्रमाणपत्र व वंशावळ

मराठा-कुणबी प्रमाणपत्रासाठी विशेष तरतूद

1) ज्या मराठा व्यक्तींकडे शेतजमिनीचा मालकी पुरावा नाही, त्यांनी १३ ऑक्टोबर १९७५ पूर्वी किंवा त्याआधी ते त्या गावात किंवा स्थानिक क्षेत्रात राहत असल्याचे प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करणे आवश्यक आहे.

2) हे प्रतिज्ञापत्र सादर झाल्यावर अधिकारी (तलाठी / तहसीलदार) चौकशी करतील.

3) या चौकशीत जर अर्जदाराचा गावातील किंवा कुळातील एखाद्या रक्ताच्या नात्यातील व्यक्तीशी संबंध असल्याचे दिसून आले आणि त्या नातेवाईकाकडे कुणबी प्रमाणपत्र आधीपासूनच असेल, तर त्या आधारावर अर्जदारालाही कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago