महाराष्ट्र

मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम…

नाशिक: मी रामकृष्ण हरी वाली आहे, फक्त माळ घालत नाही, कधी कधी खाते, खरे बोलते…मी त्यांच्यासारखं खोटं बोलत नाही आणि खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमचे आई वडील खातात, सासू सासरे खातात, नवरा खातोय आणि आपल्या पैशाने खातोय, दुसऱ्याचं काही उधार नाही. जे आहे ते आपले आहे. आपण कुणाला मिंदे नाही. जे आहे डंके की चोट पे करते है…खातो तर खातो, नेमकं कुठे जेवायला गेले, तेवढेच व्हायरल केले. खाल्लं खाल्लं त्यात काय पाप केले का? उघड खाते फक्त माळ घालत नाही. खाण्याचा मोह होतो म्हणून घालत नाही बाकी काही प्रॉब्लेम नाही. मी ज्या दिवशी माळ घालेन तेव्हा समजायचं मटण सोडून दिले असं त्यांनी म्हटलं. सुळेंच्या या विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांनी एका वाक्यात उत्तर देत मी यावर काही बोलणार नाही, त्यांच्या विधानावर वारकरी उत्तर देतील असं सांगितले.

तसेच आपल्या महाराष्ट्रात ओला दुष्काळ झाला, तुम्ही तो जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी करा या मागणीसाठी मी अमित शाहांना भेटले. दुसरे कुणी गेले का? गृहमंत्री म्हणून नव्हे तर सहकार मंत्री म्हणून त्यांच्याकडे गेले. एकजण त्यांना भेटायला गेले नाही. मुख्यमंत्री मला वेळच देत नाही. दहा वेळा भेटीची वेळ मागितली माणूस वेळ देत नाही, याचा अर्थ काय तर सुप्रिया सुळेंना वेळ द्यायचा नाही. तुम्ही माझी कामे करत नाही ना, मग माझी कामे दिल्लीतून होतात. सगळी कामे दिल्लीतून होतात असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

दरम्यान, देशात लोकशाही टिकली पाहिजे, त्यासाठी ३०० खासदार रस्त्यावर उतरले होते. ही लढाई वैयक्तिक नाही तर वैचारिक आहे. आमच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, देशात जे योग्य असेल ते मी बोलणार, ते तुम्हाला मान्य नसेल तर खुशाल गुन्हा दाखल करा, मला अटक करा. टीका करायची तर अभ्यास करून करा. सशक्त लोकशाहीत आम्हालाही लोकांच्या मागणी मांडण्याचा अधिकार आहे. दिल्लीत विरोधकांची कामे जास्त होतात. कामावर पत्ते खेळायचे आणि अब्रु नुकसानीचा दावा करणारे इथे आहेत. तुमच्याच माणसाने तुमचा कार्यक्रम केला असं सांगत सुप्रिया सुळेंनी माणिकराव कोकाटे यांचे नाव न घेता टोला लगावला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

11 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago