महाराष्ट्र

मोदी पंतप्रधान तोपर्यंत मी मंत्री; रामदास आठवले यांचा मोठा दावा

पुणे: रामदास आठवले यांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या राजकीय प्रभावाबाबत मोठा दावा केला आहे. “मी ज्यांच्यासोबत असतो, ते सत्तेत येतात; आणि जोपर्यंत नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत, तोपर्यंत मी मंत्री असेन,” असे वक्तव्य त्यांनी केले.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)चे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या आठवले यांनी धुळे येथे झालेल्या सभेत हे विधान केले. राज्यसभेवर पुन्हा वर्णी लागल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दौरा होता. धुळेतील महाराणा प्रताप चौकात झालेल्या सभेत त्यांनी आपली लोकप्रियता आणि राजकीय प्रभावावर भाष्य केले. “मी संसदेत बसून चारोळ्या करतो, त्यामुळे जगभरात माझे फॅन तयार झाले आहेत. माझी लोकप्रियता सतत वाढत आहे,” असे ते म्हणाले.

सभेत बोलताना आठवले यांनी आणखी एक दावा केला. “मी ज्यांच्यासोबत असतो त्या पक्षाला १०० टक्के सत्ता मिळते. हा आजवरचा पायंडा आहे आणि त्यात बदल होण्याची शक्यता नाही,” असे त्यांनी सांगितले.

संविधान बदलणार नाही; विरोधकांना संधी नाही

यावेळी त्यांनी विरोधकांवरही टीका केली. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेली राज्यघटना कोणीही बदलू शकत नाही. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत याबाबत खोटे नॅरेटिव्ह तयार केले होते. आता मात्र विरोधकांना केंद्रात सत्तेत येण्याची कोणतीही संधी नाही,” असे आठवले म्हणाले.

तसेच त्यांनी पंतप्रधान मोदींच्या कामकाजाचे कौतुक करत “भारताची परिस्थिती कधीही श्रीलंका, बांगलादेश किंवा नेपाळ सारखी होणार नाही,” असेही सांगितले.

कार्यकर्ता मेळावा

धुळे दौऱ्यादरम्यान आठवले यांनी पक्षाचा कार्यकर्ता मेळावाही घेतला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करत “रिपब्लिकन चळवळीची विचारधारा अधिक बळकट करण्याची गरज आहे. समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर चालत वंचित आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी काम करणे ही आपली जबाबदारी आहे,” असे सांगितले.या सभेला माजी खासदार डॉ. सुभाष भामरे, आरपीआय नेते बाबुराव कदम, सुधाकर जाधव आदी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

21 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

21 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

21 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago