महाराष्ट्र

कुणीही उपटसूंभ उठेल आणि काहीही विचारेल, मी त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्यास बांधिल नाही

अहिल्यानगर: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार रोहित पवार यांचा उपटसूंभ असा उल्लेख केला आहे. रोहित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, कुणीही उपटसूंभ उठेल आणि काहीही विचारेल, मी त्याला उत्तर द्यायला बांधिल नाही.

तसेच माणिकराव ठाकरेंच्या मंत्रिपदाबाबत मुख्यमंत्री आणि आम्ही ठरवू असंही ते म्हणाले. अहिल्यानगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण अजित पवारांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेलं संविधान हे जगातलं सर्वोत्तम संविधान म्हणून ओळख आहे. त्यांनी सर्वांना दिलेल्या न्यायाचे स्मरण अहिल्यानगर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यामुळेहोत राहील असं अजित पवार म्हणाले.

कुणी फुकटचा सल्ला देऊ नये

रोहित पवारांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात दोन गट पडल्याचे म्हटले होते. तसेच मूळ राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला पुन्हा चिन्ह परत मिळेल असंही रोहित पवारांनी म्हटलं होतं.त्यावर अजित पवार म्हणाले की, “आमच्या पक्षात किती गट आहे ते आमचं आम्ही बघू, इतरांनी फुकटचा सल्ला देण्याचं कारण नाही. कोण काय बोलतं याच्याशी मला काही देणंघेणं नाही. महाराष्ट्रात कोणीही उपटसूंभ उठेल आणि काहीही प्रश्न विचारेल. त्याला उत्तर द्यायला मी काही बांधिल नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ, दोन शेळ्या, दोन बोकड, अन एक बकरु ठार, गाय जखमी…

कारेगाव (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील निमगाव भोगी येथे बिबट्याने मध्यरात्री गोठ्यात घुसून जनावरांवर हल्ला केल्याची…

59 मिनिटे ago

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी अनुभवी कलाकारांकडून अर्ज मागविले

२५ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे आवाहन मुंबई : महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांच्या…

3 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा ऐतिहासिक दसरा मेळावा; एकनाथ शिंदे

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत शिवसेनेने यंदाचा ऐतिहासिक दसरा मेळावा बळीराजाला समर्पित…

3 तास ago

५ हजारांत शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड होणार?; हर्षवर्धन सपकाळांचा महायुती सरकारवर घणाघात

हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि संपूर्ण कर्जमाफी द्या; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सपकाळांनी मांडली…

3 तास ago

शाळा प्रवेशासाठी वयोमर्यादा निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील पूर्वप्राथमिक ते इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी राज्य शासनाने बालकांचे किमान वय निश्चित केले आहे. नव्या…

6 तास ago

‘शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही!’दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी ५ हजारांची अग्रीम मदत

पुणे: दुष्काळाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारने मदतीचा हात पुढे केला…

15 तास ago