महाराष्ट्र

ते जे बोलले ती वस्तुस्थिती आहे, ठाकरे ब्रँड आहे…

मनसे-ठाकरे गटाच्या युतीबाबत अमित ठाकरेंचं मोठं विधान

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीची चर्चा रंगली आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज सायंकाळी वरळी पोलिस कँम्पमधील मुंबईचा पोलिसांच्या राजाच्या पाद्यपूजन सोहळ्याला अमित ठाकरेंनी हजेरी लावली.

यावेळी अदित्य ठाकरे न आल्यामुळे दोघांची भेट टळली. उद्धव ठाकरेच्या वाढदिवासानिमित्त अदित्य ठाकरे येवू शकले नसतील असं अमित ठाकरेंनी सांगितलं. यावेळी अमित ठाकरे यांनी युतीबाबत भाष्य केलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

‘गणोशोत्सव आनंदाचा क्षण असल्याचं पाहिला मिळतो. काल वरळीतील पोलिस बांधव आमंत्रण देवून केले. गेल्या वर्षी ही मी आलो होतो. आज आमचा मेळावा होता. तो रद्द झाला मात्र तो संपल्या वर मी येईल असं सांगितलं होतं’ अमित ठाकरे यांनी असं विधान केलं आहे.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबत बोलताना अमित ठाकरे म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे साहेब राज ठाकरे वाढदिवासाला शुभेच्छा दिल्या. मला कुटुंब म्हणून एकत्र आलेलो आहे याचा आनंद आहे. आजची भेट ही भेट वाढदिवसापुरती होती. महानगरपालिकासाठी युतीचा निर्णय ते दोन भाऊ घेतील. आम्ही ज्युनिअर ते निर्णय घेणार नाहीत. राज ठाकरे बोलतील ते होईल.’

या कार्यक्रमावेळी बोलताना ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे म्हणाले की, ‘आज पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या मुलांनी एकत्र येऊन केलेला हा कार्यक्रम आहे. अजून पुढच्या महिन्याभर वेगवेगळ्या कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. ठाकरे हा ब्रँड आहे या शहराला ठाकरेंची गरज आहे. हे शहर ठाकरे यांना विचारत आणि त्यामुळे ते आले याचा आम्हाला आनंद आहे

उद्धव ठाकरे बोलले की माझ्यासाठी हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. शेवटी रक्ताचे नातं आहे लक्षात ठेवा. राजकारणापलीकडे जाऊन ज्यांनी नाते जपले, त्याच्यापैकी उद्धव साहेब एक आहेत. हे नातं जेवढे घट्ट होईल तेवढे महाराष्ट्राला जास्त आनंद होईल उद्धव ठाकरे यांच्या शब्दातून हे स्पष्ट झाले. बाळा नांदगावकर जे बोलले ती वास्तुस्थिती आहे, ठाकरे ब्रॅंड आहे, वन प्लस वन हे 11 जसे होतात तसेच 11 प्लस 11 हे भविष्यात 22 देखील होतील, ठाकरे या नावात ताकद आहे. महाराष्ट्रातल्या जनतेची ही इच्छा आहे की युती व्हावी आणि ती इच्छा दोन्ही ठाकरे बंधू पूर्ण करतील असं वाटतंय.’

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

6 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

6 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

7 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

7 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

7 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

7 तास ago