महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंचा एक घाव दोन तुकडे, केलं मोठं वक्तव्य

मुंबई: शिवसेना शिंदे गटाचे काही आमदार आणि मंत्री वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार संजय गायकवाड यांनी शिळे आणि खराब अन्नपदार्थ दिल्याचा आरोप करत आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली होती, हे प्रकरण चांगलंच तापलं होतं, त्यानंतर शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा बॅगेसोबतचा एक व्हिडीओ समोर आला, त्या बॅगेमध्ये पैसे असल्याचा आरोप विरोधकांनी केला. या दोन्ही नेत्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली.

हे सर्व सुरू असतानाच अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मंत्री योगेश कदम यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ज्या सावली रेस्टॉरंटवर पोलीसांनी कारवाई केली तो डान्सबार असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यामुळे विरोधकांकडून योगेश कदम यांच्या राजीनाम्याची मागणी देखील सुरू झाली.

दुसरीकडे राज्यमंत्रिमंडळात फेरबदल होणार असून, वादग्रस्त मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याच्या बातम्या देखील सातत्यानं समोर येत आहेत. दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली, या भेटीनंतर चर्चेला आणखी उधाण आलं, दरम्यान या यादीमध्ये योगेश कदम यांचं नाव देखील असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले शिंदे?

योगेश काम करणारा कार्यकर्ता आहे, टीका करून काम बंद करता येत नाही, राजीनाम्याची मागणी करणं चुकीचं, दरोडेखोर दुसऱ्याला चोर म्हणणार तर कसं होणार? योगेश कदम चिंता करायचं काम नाही, अख्खी शिवसेना आणि शिंदे तुमच्या पाठीशी आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.

वादग्रस्त मंत्र्यांचे राजीनामे घेतले जाणार असल्याची चर्चा सध्या सुरू आहे, यामध्ये योगेश कदम यांचा देखील राजीनामा घेतला जाऊ शकतो, अशी देखील चर्चा आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ समोर आल्यानं वातावरण अधिकच तापलं आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार या सर्व पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आधीच अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून दहशत; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री धुडगूस

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…

2 तास ago

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…

3 तास ago

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…

3 तास ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

4 तास ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

21 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

1 दिवस ago