संभाजीनगर: मोठ्या शहरात लोकसंख्या अधिक असल्याने लहान ढाबे आणि हॉटेल यांची संख्या खूप असते. अशा हॉटेल, ढाब्यांमध्ये बेकायदा दारू पिणाऱ्यांसाठी खास व्यवस्था केली जाते. दारूची व्यवस्था करून ग्राहक वाढविले जातात. अशात इतर वाईट गोष्टींना वाढ मिळते. तेव्हा ढाबा, हॉटेलात दारू पिणे आणि व्यवस्था करणे, अशी दोघांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई होते.
दारूच्या किमतीपेक्षा दंड जास्त
ढाबा, हॉटेलमध्ये दारू पिणे बेकायदा आहे. कायद्याचे उल्लंघन करून अशा गोष्टी करणाऱ्यांवर कारवाई होते. तेव्हा ग्राहकाने घेतलेल्या दारूच्या बाटल्या, दारूच्या किमतीपेक्षा जास्त मोठ्या रकमेची कारवाई त्यांच्यावर केली जाते. ढाबा मालकाला दारूच्या किमतीपेक्षा अधिक दंडाची रक्कम भरावी लागते. त्यामुळे उत्पादन विभागाची कारवाई बेकायदा दारू विकणाऱ्या ढाब्यावाल्याला महाग पडते.
छुप्या मार्गाने हॉटेल, ढाब्यावर दारू विक्री करणाऱ्यांकडून भेसळयुक्त दारू विकली जाण्याची शक्यता जास्त असते. अनेक गैरप्रकार होत असतात. तेव्हा परवानाशिवाय दारू विकणाऱ्या हॉटेल, ढाब्यांवर कारवाई केली जाते, असे मुंबई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे म्हणणे आहे.
ढाबा मालकावरही कारवाई
परवाना नसताना ढाबा, हॉटेलमध्ये दारू विक्रीस ठेवणे, दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणे, सोबत इतर गोष्टी पुरविणे अशा गोष्टी करणाऱ्या ढाबा, हॉटेलवरही कारवाई केली जाते.
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…