महाराष्ट्र

राज्यातील शिक्षकांचे सातव्या वेतनचे प्रलंबित हफ्ते, पेन्शन त्वरित अदा करा; सतेज पाटील

मुंबई: राज्यातील बहुतांश जिल्हयांमधील स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाचे हप्ते तसेच सेवानिवृत्तीची रक्कम थकीत असून त्यामुळे त्यांना आर्थिक समस्या उद्भवत आहे. त्यामुळे ही रक्कम त्वरित अदा करावी, अशी मागणी विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी तारांकित प्रश्नाद्वारे केली. पुरवणी मागणीद्वारे यासाठी आवश्यक रकमेची मागणी केली असून निधी उपलब्धतेनुसार सेवानिवृत्त शिक्षकांची थकबाकी भागवली जाईल, असे लेखी उत्तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.

आमदार सतेज पाटील यांनी शिक्षकांचा वेतन आयोग व सेवानिवृत्ती थकबाकी याबाबत सभागृहात आवाज उठवला. इतर शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना दुसरा तिसरा आणि चौथा हप्ता मिळाला असताना शिक्षक व शिक्षकेतर सातवा वेतनाचा फक्त पहिला व काही ठिकाणी दुसरा हप्ता मिळाला आहे. थकबाकीच्या तिसरा व चौथा हप्ता देण्यासंदर्भात दिनांक ९ मे व २४ मे २०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित केला असतानाही दोन्ही हफ्ते देणे प्रलंबित आहेत. त्यामुळे सेवा निवृत्त शिक्षक आर्थिक अडचणीत आले आहेत. याबाबत शिक्षक संघटनांकडूनही थकबाकी तातडीने जमा करण्याची मागणी होत असून थकीत रकमा अदा करून कर्मचाऱ्याना दिलासा द्यावा, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली.

यावर सरकारच्या वतीने लेखी उत्तर देताना शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी थकबाकी असल्यचे मान्य करत विविध संघटनाकडून याबात निवेदने प्राप्त झाल्याचे सांगितले. कोविड-१९ महामारीमुळे मागील काही वर्षात अपुरे अनुदान उपलब्ध झाल्याने राज्यभरातील शिक्षकांना अंशराशीकरण / उपदान तसेच सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्याची रक्कम प्रदान करता आलेली नाही. ही रक्कम प्रदान करण्याकरीता अतिरिक्त अनुदानाची आवश्यकता आहे. त्यासाठी पुरवणी मागणीद्वारे रकमेची मागणी करण्यात आली असून निधी उपलब्धतेनुसार सेवानिवृत्त शिक्षकांचे सेवानिवृत्ती उपदान, अंशराशीकरण, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता तसेच इतर प्रलंबित असलेल्या रकमा प्राधान्याने अदा करण्याचे नियोजन असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

2 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

2 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

2 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

3 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

3 दिवस ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

3 दिवस ago