महाराष्ट्र

एसटी भाडेवाढ तात्काळ मागे घ्या; अँड.अमोल मातेले

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते व युवक अध्यक्ष (मुंबई), अँड. अमोल मातेले यांनी एसटी भाडेवाढीच्या निर्णयावर प्रखर टीका करत ती तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यांनी या निर्णयामागील गोंधळावर आणि सरकारच्या भूमिकेवर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

सरकारच्या गोंधळामुळे जनता हैराण

“परिवहन मंत्र्यांनी जर भाडेवाढीचा निर्णय घेतला नसेल, तर मग हा निर्णय कोण घेतो? हे खाते चालवतं कोण? असा प्रश्न उपस्थित करत सरकारमधील जबाबदारीच्या अभावावर त्यांनी थेट हल्ला चढवला आहे. एका बाजूला परिवहन मंत्री जबाबदारी झटकतात, तर दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा याला विरोध आहे. मग, एसटी भाडेवाढ हा निर्णय नेमका कुणाचा आहे? सरकारच्या प्रत्येक निर्णयामागे गोंधळच दिसतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार का

“जर भाडेवाढीचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला असेल, तर त्यांच्यावर कारवाई का होत नाही? आणि जर चांगले निर्णय झाले तर मंत्र्यांना श्रेय, पण चुकीचे निर्णय झाले की अधिकाऱ्यांना जबाबदार धरणे, ही सरकारची दुटप्पी भूमिका आहे. परिवहन खाते म्हणजे खेळाचा मैदान नाही, हा पोरखेळ जनतेला नकोय,” असे सांगत त्यांनी सरकारमधील अंतर्गत वादांवर प्रकाश टाकला.

सरकारमधील अंतर्गत भांडणे

“एसटीसारख्या महत्त्वाच्या सेवेवर सरकारचा कोणताही ठाम निर्णय नाही. मंत्री आणि अधिकाऱ्यांमध्ये एकमेकांवर जबाबदारी टाकण्याचा खेळ सुरू आहे. परिणामी, सामान्य जनता त्रस्त होतेय. सरकारमध्ये खरेच काही ‘गंमत जंमत’ सुरू आहे का?” असा थेट सवाल त्यांनी केला.

एसटी सेवा – सामान्य जनतेचा आधार

“एसटी सेवा ही ग्रामीण आणि शहरी जनतेसाठी जीवनरेखा आहे. भाडेवाढीमुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांवर आर्थिक बोजा पडतो. सरकारने त्वरेने हा निर्णय मागे घेत जनतेला दिलासा द्यावा,” अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते एडवोकेट अमोल मातेले यांनी केली.

राजकीय जबाबदारीची गरज

“सरकारने जनतेच्या हितासाठी काम करणे आवश्यक आहे. पण इथे मात्र केवळ अंतर्गत वाद आणि निर्णयांवर गोंधळ सुरू आहे. जर सरकारला जनतेची काळजी नसेल, तर त्यांनी सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकारही नाही,” असे सांगून त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले.

अँड. अमोल मातेले

प्रवक्ते, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार 

युवक अध्यक्ष, मुंबई

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

5 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

20 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago