आरोग्य

मोहरीच्या तेलात लवंग मिक्स केल्याने शरीरातील या समस्या लगेच होतील दूर

मोहरीचं तेल बऱ्याच घरांमध्ये वेगवेगळे पदार्थ बनवण्यासाठी वापरलं जातं. बरेचजण जेवणही यातच बनवतात. या तेलाने टेस्ट तर वाढतेच, सोबतच हे तेल आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानलं जातं. तसेच लवंगही खूप फायदेशीर असते. वेगवेगळ्या उपचारांमध्ये लवंगचा वापर केला जातो. अशात जर तुम्ही मोहरीचं तेल आणि लवंगचा एकत्र वापर केला तर आरोग्यासंबंधी अनेक फायदे मिळू शकतात. या मिश्रणाने शरीरासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. खासकरून हिवाळ्यात तर हे मिश्रण अधिक फायदेशीर ठरतं. चला जाणून घेऊ याने कोणत्या समस्या दूर होतात आणि याचा वापर कसा करावा.

मोहरीच्या तेलात लवंग मिक्स करून लावण्याचे फायदे

१) संधिवात आणि सूज: मोहरीच्या तेलात लवंग मिक्स करून लावल्याने संविधाव आणि सूज दूर होण्यास मदत मिळते. लवंगमधील यूजेनॉल तत्वात अ‍ॅंटी इन्फ्लेमेटरी गुण भरपूर असतात, जे सूज कमी करण्यास मदत करतात. त्यासोबतच मोहरीचं तेल गरम असल्याने ब्लड सर्कुलेशन सुरळीत करण्यास मदत मिळते. ज्यामुळे वेदनाही कमी होतात.

२) दातांचं दुखणं होतं दूर: लवंगचा वापर दातांचं दुखणं दूर करण्यासाठी फार आधीपासून केला जात. अशात मोहरीच्या तेलात लवंग मिक्स करून हिरड्यांवर लावल्याने दातांसंबंधी दूर करण्यास मदत मिळते. या उपायाने दातांवरील इन्फेक्शन आणि हिरड्यांवरील सूजही दूर होते.

३) सर्दी-खोकला दूर होतो: सर्दी, खोकला आणि नाक बंद होणे अशा समस्या दूर करण्यासाठी मोहरीच्या तेलात लवंग मिक्स करून लावल्यास खूप फायदा मिळतो. यासाठी मोहरीच्या तेलात लवंग हलकी गरम करा. हे तेल छाती आणि पाठीवर लावून मालिश करा. याने शरीराला उष्णता मिळेल आणि तुमच्या समस्या दूर होतील.

४) त्वचेच्या इन्फेक्शनपासून बचाव: लवंगमध्ये अ‍ॅंटी बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-फंगल गुण असतात, जे त्वचेचं इन्फेक्शन रोखण्यासाठी मदत करतात. मोहरीचं तेलही अ‍ॅंटी-सेप्टिक गुणांनी भरपूर असतं. ज्याने त्वचा आणि साफ आणि हेल्दी राहते. हे मिश्रण त्वचेवर लावल्याने खाज, जळजळ आणि त्वचेच्या इतरही समस्या दूर होतात.

५) केसांची समस्या होईल दूर: मोहरीच्या तेलात लवंग मिक्स करून हे मिश्रण केसांवर लावल्यास केसांची मूळं मजबूती मिळते आणि कोंड्यासारखी समस्याही दूर होते. या मिश्रणाने डोक्याच्या त्वचेला पोषण मिळतं आणि केसगळतीची समस्या दूर होते.

(सोशल मिडीयावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

13 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

19 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

19 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

20 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

20 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

20 तास ago