महाराष्ट्र

भरसभेत शिंदेंनी उदय सामंतांना लावला फोन स्पीकर वर ठेवला अन…

1० हजार रोजगाराचं काय झालं? महाबळेश्वरच्या सभेत थेट सवाल

मुंबई: राज्यात सध्या निवडणुकीचा धुरळा जोरात सुरू असून, महापालिका निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून प्रचाराचा वेग वाढवण्यात आला असून, विशेषतः शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः मैदानात उतरले आहेत. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे झालेल्या प्रचारसभेत शिंदेंनी केलेल्या एका आगळ्यावेगळ्या कृतीमुळे ही सभा चांगलीच चर्चेत आली आहे.

महाबळेश्वरच्या प्रचारसभेत भाषण करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चक्क भरसभेतून उद्योगमंत्री उदय सामंत यांना फोन लावला. लाऊडस्पीकरवरून झालेल्या या संवादात शिंदेंनी दावोस (World Economic Forum) दौऱ्यात दिलेल्या १० हजार रोजगाराच्या आश्वासनाबाबत थेट जाब विचारला.

“मी इथे महाबळेश्वरला प्रचारासाठी आलो आहे. तुम्ही दावोसला गेलात तेव्हा या भागासाठी १० हजार लोकांना रोजगार देणारा उद्योग आणणार असल्याचं सांगितलं होतं, त्याचं काय झालं?” असा थेट सवाल शिंदेंनी केला.

यावर तत्काळ उत्तर देताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सकारात्मक माहिती दिली. “आपल्या आदेशानुसार संबंधित उद्योग प्रकल्प फायनल झाला आहे. या प्रकल्पामुळे सुमारे ८ ते १० हजार महिला आणि तरुणींना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. दावोस दौऱ्यातच याची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झाली असून, सध्या आचारसंहिता लागू असल्याने पुढील कार्यवाही थांबवण्यात आली आहे. आचारसंहिता संपताच विशेष बैठक घेऊन प्रकल्पाच्या जागेचे नियोजन निश्चित केले जाईल,” असे उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

या थेट फोन संवादामुळे सभेत उपस्थित असलेल्या मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. रोजगाराचा मुद्दा थेट भरसभेत उचलून धरल्यामुळे शिवसेनेच्या प्रचाराला अधिक धार मिळाल्याचे चित्र आहे.

महापालिका आणि नगर परिषद निवडणुकांचे निकाल ताजे असतानाच आता जिल्हा परिषद निवडणुकीत वर्चस्व मिळवण्यासाठी शिवसेनेने मायक्रो प्लॅनिंगवर भर दिला आहे. एकनाथ शिंदे राज्यभरात ३० हून अधिक सभा आणि रोड शो करणार असून, प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रचार रणनीती आखण्यात आली आहे. भाषणांमध्ये केवळ राजकीय टीका न करता दावोस येथे झालेले सामंजस्य करार, स्थानिक रोजगार, उद्योग आणि पायाभूत सुविधांवर शिंदे भर देताना दिसत आहेत.

सातारा हा उपमुख्यमंत्र्यांचा गृहजिल्हा असल्याने महाबळेश्वरसारख्या महत्त्वाच्या भागात रोजगाराचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी स्थानिक मतदारांना थेट साद घातली आहे. ८ ते १० हजार महिला व तरुणींना रोजगार देणारा हा प्रस्तावित प्रकल्प सातारा जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला कलाटणी देणारा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

9 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

13 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

13 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

13 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

13 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

13 तास ago