क्राईम

काळ्या जादूने माजी सरपंचांच्या खुनाचा कट? झाडावर फोटो टांगून अघोरी पूजा; मुख्य आरोपी अटकेत

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सातारा परिसरात भाऊबंदकीचा वाद आणि राजकीय वैमनस्यातून कथित अघोरी पूजा व काळी जादू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माजी सरपंच फेरोज पटेल आणि त्यांच्या तीन भावांना लक्ष्य करून कथित जादूटोण्याचा कट रचल्याचा आरोप असून, या प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी आयुबखान पठाण याला अटक केली आहे.

तक्रारीनुसार, आरोपीने एका मांत्रिकाच्या मदतीने माजी सरपंच आणि त्यांच्या भावांचे फोटो झाडावर टांगून अघोरी विधी केल्याचा आरोप आहे. तसेच त्यांना जीवे मारणे, आर्थिक व शारीरिक नुकसान करणे आणि खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवण्याचा कट रचल्याचाही दावा करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा उलगडा आरोपीचा माजी चालक व अंगरक्षक मोहम्मद इर्शाद याने केला. जादूटोण्यासाठी मांत्रिकाला आणणे-नेणे आणि पूजेचे साहित्य पुरविण्याची कामे आपण करत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने नोकरी सोडून पोलिसांकडे धाव घेतली. त्याच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू करून मुख्य आरोपीला अटक केली.

या कथित अघोरी विधीमध्ये आणखी कोणाचा सहभाग होता, संबंधित मांत्रिक कोण आहे आणि या कटामागील नेमके कारण काय, याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

3 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

7 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

7 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

7 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

7 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

7 तास ago