मुंबई विद्यापीठाबाहेर तीव्र आंदोलन; केंद्र सरकारवर दडपशाहीचा आरोप, मिलिंद अण्णा कांबळे यांचा इशारा
मुंबई: दिल्लीतील आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलिस कारवाईचा निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने सोमवारी मुंबई विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर जोरदार आंदोलन केले. सोनम वांगचूक यांच्या अटकेचा निषेध करत पक्षाने केंद्र सरकारवर लोकशाही दडपल्याचा आरोप केला. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
हे आंदोलन पक्षाचे मुंबई अध्यक्ष व माजी आमदार मिलिंद अण्णा कांबळे, युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले आणि वैभव गाढवे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक आणि पक्षाचे पदाधिकारी सहभागी झाले. सरकारविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी केंद्र सरकारच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला.
यावेळी मिलिंद अण्णा कांबळे म्हणाले की, शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज करणे म्हणजे लोकशाहीची गळचेपी आहे. शिक्षण क्षेत्रातील अपयशाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. अन्यथा देशातील तरुण सरकारविरोधातील आंदोलन अधिक तीव्र करतील, असा इशाराही त्यांनी दिला.
युवक अध्यक्ष ॲड. अमोल मातेले आणि वैभव गाढवे यांनीही सरकारने लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न थांबवावा, अन्यथा राज्यभर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला.
दरम्यान, या आंदोलनात करण्यात आलेले आरोप आणि मागण्या या संबंधित पक्षाच्या भूमिका असून त्यावर केंद्र सरकारची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…