महाराष्ट्र

रामरक्षेपूर्वी स्वतःची रक्षा करा”; उबाठाच्या आंदोलनावर एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

राहुल गांधी, सोनिया गांधी, अखिलेश यादव यांना आधी निमंत्रण द्या; बाळासाहेबांच्या विचारांचा उल्लेख करत शिंदेंची टीका

मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाच्या ‘रामरक्षा आंदोलनावर’ जोरदार टीका करत, “रामरक्षेपूर्वी स्वतःची रक्षा करा,” असा टोला लगावला. हिंदुत्व ही गरजेनुसार वापरण्याची गोष्ट नसून ती विचारसरणी असल्याचे सांगत त्यांनी उबाठाने काँग्रेससोबत युती करून बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी तडजोड केल्याचा आरोप केला.

शिंदे म्हणाले की, प्रभू श्रीरामांनी पित्याच्या वचनासाठी १४ वर्षांचा वनवास पत्करला, मात्र ज्यांनी स्वतःच्या वडिलांचे विचारच सोडले त्यांना श्रीरामांच्या आदर्शांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. हे आंदोलन रामरक्षेसाठी नसून स्वतःच्या पक्षाच्या रक्षणासाठी असल्याचा दावा त्यांनी केला.

रामरक्षा आंदोलनाचे निमंत्रण देण्यापूर्वी राहुल गांधी, सोनिया गांधी आणि अखिलेश यादव यांना बोलवावे, त्यानंतरच RSS प्रमुख आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण द्यावे, अशी टीकाही त्यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्यात आले आणि कलम ३७० हटवण्यात आले. बाळासाहेब ठाकरे आज असते तर त्यांनी या निर्णयांचे स्वागत केले असते, असे सांगत शिंदे यांनी उबाठाच्या नेतृत्वावर मोदी आणि अमित शाह यांच्यावर सातत्याने टीका करण्याचा आरोप केला.

२०१९ मध्ये सत्तेसाठी उबाठाने बाळासाहेबांच्या विचारांशी तडजोड केली असून महाराष्ट्रातील जनतेने निवडणुकीत त्यांना त्याचे उत्तर दिले, असा दावाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

6 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

10 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

10 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

10 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

10 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

10 तास ago