महाराष्ट्र

मुंबईत 27-28 एप्रिलला आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मीट; एमएसएमई उद्योगांना निर्यातीच्या नव्या संधी

मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादिततर्फे महाराष्ट्र शासनाच्या ‘रॅम्प’ (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत चौथ्या रिव्हर्स बायर-सेलर मीटचे आयोजन करण्यात आले आहे. हा आंतरराष्ट्रीय व्यापार कार्यक्रम इंडिया एसएमई फोरमच्या सहकार्याने 27 व 28 एप्रिल 2026 रोजी द लीला हॉटेल, अंधेरी, मुंबई येथे पार पडणार आहे.

दोन दिवस चालणाऱ्या या उपक्रमातून निर्याताभिमुख एमएसएमई उद्योगांना जागतिक खरेदीदारांशी थेट संवाद साधण्याची, उत्पादने व सेवांचे सादरीकरण करण्याची तसेच निर्यात वाढीसाठी नव्या संधी शोधण्याची संधी मिळणार आहे. एचएसएन कोडवर आधारित अचूक मार्केट मॅचिंग प्रणालीमुळे निर्यातदार आणि विदेशी खरेदीदार यांच्यात लक्ष्यित जुळवणी साधली जाणार आहे.

या कार्यक्रमासाठी सुमारे 40 आंतरराष्ट्रीय खरेदीदार सहभागी होणार असून ते रवांडा, दक्षिण आफ्रिका, जपान, जॉर्डन, हंगेरी, घाना, कॅमेरून, इटली, ऑस्ट्रिया, पापुआ न्यू गिनी, युगांडा, झांबिया, जर्मनी आदी देशांतून येणार आहेत.

विविध क्षेत्रांचा सहभाग

कृषी व अन्न उत्पादने, ऑटोमोबाईल व अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स व ऊर्जा, रसायने व प्लास्टिक, औषधनिर्मिती व आरोग्यसेवा, वस्त्रोद्योग व लेदर, आयटी व डिजिटल सेवा, बांधकाम व पायाभूत सुविधा, वित्तीय व व्यावसायिक सेवा तसेच शिक्षण व कौशल्य विकास अशा विविध क्षेत्रांतील 200 हून अधिक एमएसएमई उद्योग या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. पूर्वनियोजित बी2बी बैठका हे या उपक्रमाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे.

परिसंवाद व विशेष सत्र

‘महाराष्ट्रातील एमएसएमई निर्यात : संधी व परिसंस्था’ या विषयावर परिसंवाद व तज्ज्ञ पॅनेल चर्चा आयोजित करण्यात येणार आहे. डीजीएफटी, कस्टम्स, ईसीजीसी, एक्झिम बँक, अमेझॉन, ॲरॉमेक्स आणि टाटा एआयजी यांसारख्या संस्थांचे प्रतिनिधी या चर्चेत सहभागी होणार आहेत. यानंतर ‘निर्यात वित्तपुरवठा : कर्ज व व्यापार सुलभीकरण’ या विषयावर विशेष सत्र एक्सिस बँकेतर्फे आयोजित करण्यात येईल.

विशेष प्रदर्शन

कार्यक्रमादरम्यान पैठणी साड्या, एमएसएसआयडीसी उत्पादने, बांबू उत्पादने, अन्नपदार्थ तसेच महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे मध उत्पादने यांचे विशेष प्रदर्शनही भरविण्यात येणार आहे.

एमएसएमई क्षेत्राला चालना

या उपक्रमाचा उद्देश एमएसएमई उद्योगांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश मिळवून देणे, ओडीओपी व जीआय उत्पादनांना प्रोत्साहन देणे आणि जागतिक पुरवठा साखळीत त्यांचा सहभाग वाढवणे हा आहे. याशिवाय क्षमता विकास कार्यशाळा, नोंदणी व परवाना मार्गदर्शन, निर्यात सल्ला, व्यापार वित्तपुरवठा, ईएसजी प्रमाणपत्रे तसेच तज्ज्ञांशी संवाद यांद्वारे उद्योगांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार असल्याची माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विकास पानसरे यांनी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

3 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

3 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

3 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

4 तास ago