महाराष्ट्र

हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपचा आदर? अनंत गाडगीळ यांचा संतप्त सवाल

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी भाजप आणि मुंबई महापालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

१४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने अनुयायी ‘राजगृह’ येथे दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून राजगृहासमोरील पदपथावर फिरती शौचालये उभारण्यात आली होती. त्या दिवशी स्थानिक नागरिकांनी याबाबत कोणतीही तक्रार केली नव्हती. मात्र, जयंतीला १० दिवस उलटूनही ही शौचालये अद्याप त्याच अवस्थेत असल्याने परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारींकडेही महापालिकेने दुर्लक्ष केल्याचा आरोप गाडगीळ यांनी केला आहे.

यासोबतच ‘राजगृह’ परिसरातील अतिक्रमणाचा मुद्दाही त्यांनी पुन्हा उपस्थित केला. काही वर्षांपूर्वी विधानपरिषदेत स्वतः गाडगीळ यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने तत्कालीन राज्यमंत्री रणजित पाटील यांनी ‘राजगृहाभोवतालच्या अर्धा किलोमीटर परिसरात सर्व प्रकारच्या अतिक्रमणाला बंदी’ असल्याचे जाहीर केले होते, याचीही त्यांनी आठवण करून दिली.

तथापि, सध्याच्या घडीला ‘राजगृह’ परिसर टॅक्सी, फेरीवाले आणि शाळांच्या अनधिकृत वाहनांनी वेढलेला आहे. या संदर्भात गाडगीळ तसेच स्थानिक नागरिकांनी ‘एफ’ विभागाच्या उपआयुक्तांकडे वारंवार तक्रारी केल्या असूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या भाजपचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा हा आदर आहे का, असा थेट आणि परखड सवाल अनंत गाडगीळ यांनी उपस्थित केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

3 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

3 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

3 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

3 तास ago