महाराष्ट्र

राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली आहे का?

मुंबई: रायगड, नांदेड, लातूर, ठाणे, तसेच महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये हिंसाचार, राज्यात महिलांवरील बलात्काराच्या वाढत्या घटना, दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या, त्यामुळे महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. राज्यात खोके देऊन फक्त आमदार, खासदार विकत घेण्याचं सरकारच धोरण आहे. राज्यात आज राजकारणाचे गुन्हेगारीकरण झालं आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते एडवोकेट अमोल मातेले यांनी केला.

पुण्याच्या वेल्हा तालुक्यातील किल्ले राजगडा पायथ्याशी रविवारी दर्शना पवार हिचा मृतदेह सापडला. MPSC परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या दर्शना पवार हिची हत्या होणं महाराष्ट्र साठी अतिशय दुर्दैवी बाब आहे. त्याच सोबत गेल्या काही दिवसांपूर्वीच मुंबईत वस्तीगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीची हत्या झाली.तर नुकतंच चालू लोकलमध्ये महिला डब्यात एका तरुणानं मुलीचा छळ केल्याचा प्रकार समोर आला .तर दुसरीकडे नांदेड जिल्ह्यातील बोंढार गावात जातीयवादी गावगुंडांनी अक्षय भालेराव या तरुणाचा निर्घृण खून केल्याची घटना ताजी असतानाच.

लातूरमधील रेणापूर येथे सावकाराकडून फक्त तीन हजार रुपयांसाठी एका दलित व्यक्तीची डोळ्यात मिरचीपूड टाकून बेदम मारहाण करुन हत्या करण्यात आली आहे. हे सगळं कमी म्हणून काय तर मीरारोड येथील एका गृहस्थाने आपली पार्टनर सरस्वती हीचा निर्घृन खून केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले, त्यांना नष्ट करण्यासाठी ते कुकरमध्ये शिजवले, या घटना पुरोगामी महाराष्ट्राला व मानवतेला काळीमा फासणाऱ्या घटना आहेत. असे राष्ट्रवादी काँग्रेसचे बघते एडवोकेट अमोल मातेले यांनी सांगितले

राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्हीही महिलांबाबत असंवेदनशील आहे. या घडणाऱ्या घटना राज्याला अस्वस्थ करणाऱ्या असल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात राज्यातील कयदा व सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असल्याचं स्पष्ट होत आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ असा बीजेपीच धोरण असलं तरी त्यांच्या राज्यात महिला, माता, भगिनी सुरक्षित नाही हे वारंवार स्पष्ट होत आहे. या सगळ्या घटना पाहता थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

28 मिनिटे ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

4 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

6 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago