ठाणे: शिक्षणात सर्वसमावेशकता आणून प्रत्येक विद्यार्थ्याला वर्गात आपलेपणा आणि सन्मानाची वागणूक मिळणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ठाणे येथील ‘सत्कार रेसिडेन्सी’ येथे डॉ. रेवती श्रीनिवासन लिखित “Creating Classrooms Where Every Child Belongs” या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. त्यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी खासदार नरेश म्हस्के, माजी खासदार आनंद परांजपे, उपप्रादेशिक अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी डॉ. रेवती श्रीनिवासन यांच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले. “विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि प्रत्येकाला समान संधी मिळण्यासाठी वर्गातील वातावरण सर्वसमावेशक असणे आवश्यक आहे. हे पुस्तक शिक्षक, पालक आणि शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांसाठी दीपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरेल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य
गेल्या तीन दशकांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या डॉ. रेवती श्रीनिवासन यांनी सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबतच विशेष गरजा असलेली मुले, ग्रामीण भागातील विद्यार्थी तसेच सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांतील मुलांसाठी विविध उपक्रम राबविले आहेत. थेरपी सेंटर्स आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम त्यांनी केले आहे.लंडनमधील ‘हाऊस ऑफ लॉर्ड्स’मध्ये झालेला त्यांचा सन्मान आणि त्यांनी उभारलेला शैक्षणिक वारसा हा ठाणेकरांसाठी अभिमानाची बाब असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
आनंद दिघेंसोबतच्या आठवणींनाही उजाळा
कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्यासोबतच्या आठवणींनाही उजाळा दिला. शाळेतील प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सामान्य कार्यकर्ते आणि पालकांच्या विनंत्या घेऊन प्रत्यक्ष शाळेत जाण्याच्या जुन्या प्रसंगांचे त्यांनी स्मरण केले.
यावेळी डॉ. रेवती श्रीनिवासन यांनी शिक्षणाचा उद्देश केवळ साक्षरता नसून, प्रत्येक बालकाच्या क्षमतेचा शोध घेऊन त्याला समाजात आत्मसन्मानाने जगण्याचे बळ देणे हा आहे, असे सांगितले. विशेष गरजा असलेल्या मुलांसह ग्रामीण आणि सामाजिक-आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांतील मुलांसाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. विशेष थेरपी सेंटर्स आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून या मुलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या आयुष्याला नवी दिशा दिली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
लातूर : राज्यातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड, अपुरा व अनियमित पाऊस तसेच अल निनोच्या…
बिबट्याच्या दहशतीत शेतकऱ्यांचा जीव धोक्यात; जीव मुठीत धरुन पिकांना पाणी देण्याची वेळ शिरुर (तेजस फडके):…
चारचाकीसाठी माहेरहून पैसे आणण्याचा तगादा? छळाच्या आरोपावरून सात जणांविरुद्ध गुन्हा छत्रपती संभाजीनगर : अवघ्या चार…
पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवल्याच्या प्रकरणात अमित…
मुंबई: वांद्रे-वरळी सी लिंक रेक्लेमेशनजवळ कोस्टल रोडवर शुक्रवारी रात्री भीषण अपघात झाला. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात…
पुणे : भाविकांना भीमाशंकर येथे दर्शनासाठी घेऊन आलेल्या २५ वर्षीय तरुण कारचालकाचा अचानक हृदयविकाराचा झटका…