मुंबई: राज्यातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस 24 तास कार्यरत असतात. अनेकवेळा जिवाची पर्वा न करता ते आपले कर्तव्य बजावत असतात. मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावरच हल्ले होत आहेत. गेल्या तीन महिन्यात तीसहून अधिक हल्ले पोलीसांवर झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पोलीसांवर हल्ल्याची प्रवृत्ती बळावू नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यांवर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याची आवश्यकता आहे. या हल्ल्यांमुळे पोलीसांचे मनोधैर्य खच्ची होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलीसांवर हल्ला करणाऱ्यांवर सरकारने जरब बसविण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्यात पोलीसांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहेत. पोलीसांवर हल्ला झाल्याच्या जवळपास तीसहून अधिक घटना मागील तीन महिन्यात घडल्या आहेत. अंगवार थेट गाडी चढवणे, गाडीसोबत फरफटत नेणे, लोकांनी पोलीसांच्या अंगावर धावून जाणे अशा घटनात वाढ झालेली आहे. एकंदरितच राज्यात पोलीसांवर वेगवेगळया ठिकाणी हल्ला होण्याच्या घटना वाढत असून नागरिकांच्या संरक्षणासाठी 24 तास कार्यरत असणाऱ्या पोलीसांनाही संरक्षण, संपर्कासाठी वॉकी टॉकी, मोटारसायकल इ.गोष्टी पुरविण्याची आवश्यकता आहे.
पोलीसांवर हल्ल्याची प्रवृत्ती वाढू नये म्हणून असे गुन्हे करणाऱ्यावर न्यायालयात त्वरित दोषारोपपत्र दाखल करण्याची आवश्यकता आहे. दोषींवर त्वरित कार्यवाही होण्यासाठी शासनाने करावयाचे प्रयत्न, पोलीसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि असे हल्ले होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…