महाराष्ट्र

कुठल्याही परिस्थिती शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून द्या…

मुंबई: अवकाळीसह अनेक संकटांनी शेतकरी अडचणीत आला आहे. यातून पुन्हा उभे राहण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असताना त्यांची वीज खंडित केली जाते. त्यामुळे शेतकरी अधिक अडचणीत येत आहे. त्यामुळे शेतकरी जोपर्यंत अडचणीत आहे तोपर्यंत शेतकऱ्यांची वीज तोडली जाऊ नये. तसेच शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थिती दिवसा ठरविक वेळेत वीज उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांनी आज तारांकित प्रश्नाद्वारे सभागृहात केली.

एकीकडे दुरुस्त झालेला ट्रान्सफार्मर लावला की तो दुसऱ्याच दिवसी नादुरुस्त होतो अशी सद्याची परिस्थिती आहे. तसेच महावितरण शेतकऱ्यांना आठ तास दिवसा आणि आठ तास रात्री वीज उपलब्ध करून देते असे सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात दिवसा वीज उपलब्ध करून दिली जात नाही ही सत्यता आहे. ती प्रत्यक्षात पडताळून पहावी. तसेच कुठल्याही परिस्थितीत दिवसा ठराविक वेळ ठरून शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून देण्यात यावी आणि अवकाळीसह अनेक संकटांनी शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकरी जोपर्यंत अडचणीत आहे तोपर्यंत त्यांची वीज तोडण्यात येऊ नये, अशी मागणीही छगन भुजबळ यांनी सभागृहात केली.

दरम्यान यावर उत्तरात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रान्सफार्मरच्या येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आरडीएसएसच्या योजनेच्या माध्यमातून ट्रान्सफार्मरची क्षमता वाढविण्यात येत आहे. यासाठी सुमारे तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत शेतकऱ्यांना पर्यायी व्यवस्था करून देण्यास प्रयत्न सुरु आहे. सोलर फेडररायजेशन योजना जलद गतीने राबविण्यात येईल अशी माहिती दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

2 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

5 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

7 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago