मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक मोठी उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून अधिकृत घोषणाही पक्षाकडून करण्यात आली आहे. या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही रणनीती म्हणून पाहिली जात आहे.
जयंत पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावर होते. त्यांनी अनेक निवडणुका पक्षाच्या नेतृत्वाखाली लढवल्या आहेत. मात्र, सध्या पक्षात नव्या दमाच्या नेतृत्वाची गरज असल्याने, त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. शशिकांत शिंदे हेही अनुभवी आमदार असून, ग्रामीण महाराष्ट्रात त्यांची मजबूत पकड आहे. त्यामुळे पक्षसंघटना बळकट करण्यासाठी त्यांच्या निवडीला प्राधान्य देण्यात आलं आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…