महाराष्ट्र

‘या’ शहरात होणार जिओ ची 5G सर्विस सुरु…

औरंगाबाद: देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या Reliance Jio ने काही दिवसांपूर्वीच 5G सेवा लाँच केली आहे. कंपनी आपल्या सेवेचा हळूहळू विस्तार करत असून आता कंपनीने देशभरातील आणखी 11 शहरात 5G सर्व्हिस सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

या 11 शहरामध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि नाशिक या शहरांचा समावेश आहे. त्यामुळे या दोन्ही शहरातील नागरिकांना आता हाय-स्पीड इंटरनेटचा लाभ मिळेल. यापूर्वी राज्यातील मुंबई आणि पुण्यात Jio 5G सर्विस सुरु करण्यात आली होती.

जिओ ने आता औरंगाबाद, नाशिक, लखनौ, त्रिवेंद्रम, म्हैसूर आणि चंदीगड, मोहाली, पंचकुला, जिरकपूर, खरड आणि डेराबस्सी याठिकाणी 5G सेवा करण्याची घोषणा केली आहे. या शहरातील यूजर्सना जिओ वेलकम ऑफर’ अंतर्गत आमंत्रित केले जाईल. त्यानंतर जिओ यूजर्सना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय 1Gbps पेक्षा जास्त वेगाने अमर्यादित डेटा मिळणार आहे.

Jio 5G Welcome Offer चा फायदा कसा घ्याल?

Jio वेलकम ऑफर कंपनीच्या MyJio App या अ‍ॅपवर उपलब्ध आहे. कंपनीने ५जी नेटवर्क उपलब्ध असलेल्या शहरातील यूजर्सला या ऑफरचा फायदा घेण्यासाठी इनव्हाइट केले आहे. MyJio App तुम्हाला टॉपवर एक बॅनर मिळेल. ज्यामध्ये जिओ ५जी चा उल्लेख करण्यात आला आहे. या वर क्लिक केल्यानंतर I’m Interested चा ऑप्शन मिळेल. यावर क्लिक करुन तुम्ही Jio Welcome Offer साठी रजिस्टर करु शकता.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड…

19 मिनिटे ago

अळीवचे आरोग्यदायी फायदे

अळीवमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा…

3 तास ago

केस गळतीवर घरगुती उपाय

1) केस गळणे ही सौंदर्य बिघडविणारी सर्वात मोठी समस्या आहे. केस गळणे थांबवून ते पुन्हा…

3 तास ago

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची लढाई पुढे नेणे हीच खरी आदरांजली; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची…

3 तास ago

Video: रांजणगाव MIDC तील कंपनीत टेम्पो आणि रॅम्पमध्ये चेंगरून चालकाचा मृत्यू…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोच्या मागील बाजूचा पडदा बांधत असताना…

15 तास ago

शिरूर! पिंपळे जगताप पाझर तलावातील खुनाचा तीन दिवसांत छडा; तिघांना अटक; कारण उघड…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी…

18 तास ago