महाराष्ट्र

मंचर येथील पत्रकार सचिन तोडकर यांच्या चारचाकी गाडीने अचानक घेतला पेट

मंचर (प्रतिनिधी): येथील पत्रकार सचिन तोडकर आणि त्यांचे कुटुंबीय भीमाशंकर येथे बुधवार (दि 31) रोजी देव दर्शनासाठी जात असताना पोखरी गावच्या हद्दीत चारचाकी कारने बुधवार दुपारी अचानक पेट घेतला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पत्रकार तोडकर यांचे बंधू हनुमंत तोडकर हे पाठीमागे दुसऱ्या गाडीत असल्याने त्यांनी पत्रकार तोडकर यांना गाडी पेटल्याची तत्काळ फोनद्वारे माहिती दिली. त्यामुळे पत्रकार तोडकर यांनी तात्काळ गाडी थांबवून ते कुटुंबियासह गाडीच्या बाहेर उतरले आणि त्यानंतर गाडी आगीच्या ज्वाळात सापडली.

याबाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पत्रकार सचिन तोडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी भीमाशंकर येथे जाण्याचे ठरवले. त्यानंतर घरातीलच दोन गाड्यांमध्ये सचिन तोडकर आणि त्यांचा भाऊ भीमाशंकर या ठिकाणी दोन चारचाकी कारने निघाले होते.

सचिन तोडकर यांच्याकडे त्यांची डस्टर गाडी क्रं एम एच 43 ए एन 6986 हि गाडी होती. तर भावाकडे दुसरी चारचाकी गाडी होती. हुतात्मा बाबू गेनू जलाशय डिंभे धरणावर फिरुन ते भीमाशंकर येथे जाण्यासाठी निघाले असता पोखरी गावच्या हद्दीत दुपारी 3:30 च्या दरम्यान सचिन तोडकर यांच्या गाडीच्या पुढच्या आणि मागच्या बाजूतून अचानक धूर व जाळ निघू लागला.

पत्रकार सचिन तोडकर हे स्वतः गाडी चालवत असल्याने त्यांच्या हि बाब लक्षात आली नाही. मात्र त्यांच्याच गाडीच्या पाठीमागे असलेला त्यांचा भाऊ हनुमंत तोडकर यांना गाडीच्या पुढच्या व मागच्या बाजुने जाळ व धूर येत असल्याचे दिसले. त्यांनी याबाबत फोन करुन सचिन तोडकर यांना माहिती दिली. त्यानंतर सचिन तोडकर यांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ गाडी रत्यावर थांबवली. तसेच गाडीत असलेली त्यांची पत्नी, मुलगा, भाचा, दोन लहान मुली यांना गाडीच्या बाहेर काढले. तोपर्यंत गाडीतील पुढील भागाला आग लागली होती.

त्यानंतर गाडीतील थंड पाण्याने त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला असता ती वीझली नाही. मग तेथूनच जवळ असलेल्या हॉटेल ज्ञानेश्वर चे मालक नारायण सोळसे यांनी पाण्याचा टँकर आणून आग विझवली. या आगीत गाडीचा काहीभाग पूर्णपणे जळाला असून मोठें नुकसान झाले आहे. दरम्यान गाडीच्या मागे असलेले हनुमंत तोडकर यांनी फोन केल्याने मोठी दुर्घटना टळली तसेच दैव बलवत्तर म्हणून आमचे कुटुंब वाचले अशी प्रतिक्रिया पत्रकार सचिन तोडकर यांनी दिली. तसेच गाडी पेटल्यानंतर आग विझविण्यासाठी सोळसे बंधू यांनी खूप मोलाची मदत केली याबाबत त्यांनी सोळसे बंधूचे आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संसदेत चर्चा नाही, पण मंत्र्यांच्या दालनात महाराष्ट्राचे प्रश्न! तटकरे मैदानात; ४३८ कोटींच्या निधीसह कोकणासाठी मोठ्या मागण्या

मुंबई-गोवा महामार्गाच्या टोलनाक्यांपासून जलजीवन मिशनच्या ४३८ कोटींपर्यंत मुद्दे केंद्रीय मंत्र्यांकडे मांडले मुंबई: लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात…

11 तास ago

शिक्रापूर येथील सलूनमध्ये काम केलेल्या युवकाच्या कारस्थानाचा पर्दाफाश…

पुणे : हवाई दलाच्या एका मृत जवानाच्या नावाने बनावट ओळखपत्र बनवून सैन्याचा अधिकृत गणवेश मिळवण्याच्या…

14 तास ago

संसदेत पुढील आठवडा ठरणार निर्णायक

सीमांकन, महिला आरक्षण आणि FCRA विधेयकांवरून सरकार-विरोधक आमनेसामने नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा तिसरा…

15 तास ago

जळगावात शाळकरी विद्यार्थ्यावर चॉपरने हल्ला; जुन्या वादातून दहावीतील विद्यार्थ्याला गंभीर दुखापत

जळगाव : शहरातील अयोध्या नगर परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांमधील जुन्या वादाला हिंसक वळण मिळाल्याची धक्कादायक घटना…

16 तास ago

परदेशात नोकरीचं आमिष; पोर्तुगालमध्ये महिलेला शरीरविक्रीसाठी दबाव? पुण्यात आंतरराष्ट्रीय रॅकेटचा गंभीर आरोप

पुणे : नोकरीच्या शोधात परदेशात जाणाऱ्या महिलांना चांगला पगार आणि उज्ज्वल भविष्याचं आमिष दाखवून त्यांची…

16 तास ago

व्यावसायिकावर गोळीबार करणारे उज्जैन येथून जेरबंद…

शिरूर: शिरसवडी (ता. हवेली) येथे जमीन व्यावसायिक संतोष गावडे यांची गाडी तिघांनी आपली गाडी बंद…

17 तास ago