महाराष्ट्र

खेड तालुक्यातील वाफगाव येथे आकाशातुन अज्ञात वस्तु थेट जमिनीवर…

राजगुरुनगर (प्रतिनिधी): वाफगाव (ता.खेड) येथे आकाशातुन अज्ञात वस्तु थेट जमिनिवर येत असताना पँराशुट फुटले व त्याच्या आवाजाने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये काहीवेळ खळबळ उडाली. हे सॅटेलाईटच्या निरिक्षकाचे उपकरण असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून संबधित वस्तू पोलिसांनी पंचनामा करत ताब्यात घेतली. परंतु संबधित उपकरण हवामान विभागाचे असून कोणताही धोका नसल्याची माहिती हवामान विभागाने पत्राद्वारे दिल्याने सगळ्यांनाच दिलासा मिळाला. या उपकरणावर कोरियन भाषेतला मजकूर आढळुन आला.

खेड तालुक्यातील वाफगाव या गावामध्ये आकाशामधून अचानक एक उपकरण असल्यासारखी वस्तू जमिनीवर पडली ती पडत असताना या वास्तूला असलेला बलून फुटल्यामुळे मोठा आवाज झाला. त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांना आवाज आल्यामुळे त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले होते पण हवामान विभाग व पोलीस यंत्रणेच्या खुलाशामुळे कसलाही धोका नसल्याची माहिती देण्यात आल्याने शेतकरी व नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

याबाबत सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार खेड दि३१ मे रोजी सकाळी 8:30 च्या सुमारास वाफगाव येथील टाकळवाडी रोड येथील भरत शांताराम राम्हाणे यांच्या शेतात आकाशातुन एक छोटेसे मशिन पडले असून त्याला पांढऱ्या रंगाचा धागा व पुढे पांढऱ्या रंगाचा फुगा आहे अशी माहिती पोलीस हवालदार साबळे, शेळके व पोलीस कॉन्स्टेबल बांडे यांना मिळाली असता संबधित पोलीस कर्मचाऱ्यांनी व नागरिकांनी प्रत्यक्षात त्या मशिन जवळ जावुन पाहणी केली असता ते मशिन हवामान विभागाचे असावे असा प्राथमीक अंदाज करण्यात आला. पोलीस कर्मचाऱ्यांनी संबंधितांनी मशिनचे संपुर्ण फोटो काढुन मशिनची बारकाईने पाहणी केली असता सदरचे मशिन हे रेडीओसोंड डीटीआर ( RADIOSONDE DTR – WxR 301D) मशिन होते व ते हवामान मोजण्याचे मशिन असल्याची खात्री झाल्यानंतर ते मशिन ताब्यात घेतले.

सदर मशिनच्या बाबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक यांना व हवामान विभाग पुणे यांना माहिती दिली. हवामान विभाग पुणे यांना लेखी पत्राद्वारे कळविले. त्याबाबत हवामान विभागाचे अधिकारी टी सी मोहाडीकर यांनी सदरचे मशिन हे आमच्या विभागाकडील असुन ते तापमान, हवामानातील आद्रता, हवेचा दाब, उंची, हवेची दिशा, हवेचा वेग मोजण्यासाठी वापरण्यात येते. ते जमिनीपासुन 35 ते 40 किलोमीटरवर आकाशामध्ये कार्यक्षेत्रात काम करत असते ते आमचे दैनंदिन कामकाजातील भाग आहे. त्या मशिनपासुन कोणताही धोका नसुन ते परत वापरण्यास आयोग्य आहे असे त्यांनी लेखी पत्राव्दारे कळविलेले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूरचा शेतकरी दुष्काळात होरपळतोय; लोकप्रतिनिधी वाढदिवसाच्या जल्लोषात; फ्लेक्स, बॅनर अन् वाढदिवसाच्या उधळपट्टीवर शेतकऱ्यांचा संताप…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…

22 तास ago

शिरूर गोळ्यांच्या आवाजाने हादरतोय; पाच घटनांमध्ये तिघांचा मृत्यू, एकाचा गंभीर मारहाणीत बळी…

शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यातील दोन हवालदारांवर एसीबीची कारवाई; एकाने घेतली लाच तर दुसरा झाला पसार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

2 दिवस ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

2 दिवस ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

2 दिवस ago