औरंगाबाद: संभाजीनगर शहरात १ ते ७ जूनदरम्यान श्रीराम मंदिर मठ बालाजी ट्रस्ट पिसादेवी येथे कथा वक्ते पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या मुखंवाणीतून महाशिवपुराण हा सात दिवसीय कार्यक्रम होत असून या कार्यक्रमाला भाविकांची मोठी उपस्थिती असणार आहे. त्यामुळे एक जून ते ७ जूनपर्यंत दररोज सकाळी ९ ते रात्री १० या वेळेत पोलिस प्रशासनाने वाहतुकीत बदल केला आहे. भाविकांची वाहने वगळून इतर वाहनांसाठी काही मार्ग बंद करण्यात येणार आहेत. वाहतुकीमध्ये आवश्यकतेनुसार बदल केला जाऊ शकतो, असे वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे यांनी सांगितले.
हे मार्ग राहतील बंद…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते पिसादेवी टी पाॅइंटकडे जाणारा मार्ग.
हर्सूल टी पॉइंट ते एन-१ च्या दिशेने जाणारा मार्ग.
हे असतील पर्यायी मार्ग…
वोखार्ड टी पॉइंट ते नारेगाव टी पॉइंट मार्ग.
पिसादेवी टी पॉइंट- सावंगी बायपास टी पॉइंट व जकात नाका, हर्सूल टी पॉइंट आणि शरद टी पॉइंट या मार्गाने वाहने येतील व जातील.
एन-१ चौक, चिश्तिया चौक, सेंट्रल नाका, आझाद चौक, आयपी मेस चौक, टीव्ही सेंटर चौक, हडको कॉर्नर, हर्सूल टी पॉइंट यामार्गे वाहतूक सुरू राहील.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…
एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…
पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…
मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…
निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…
‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…