महाराष्ट्र

गेट वे ऑफ इंडिया येथून आज क्रीडा ज्योत रॅलीस प्रारंभ

मुंबई शहरात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

मुंबई: महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांना २ जानेवारी २०२३ पासून शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे, बालेवाडी, पुणे येथून प्रारंभ होणार आहे. आज ३० डिसेंबर रोजी गेट वे ऑफ इंडिया येथून क्रीडा ज्योत रॅलीस प्रारंभ होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली.

३९ क्रीडा प्रकारांमध्ये होणाऱ्या या स्पर्धा राज्यातील निवडक शहरांच्या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील स्पर्धा आयोजनाचा आढावा बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.

या बैठकीत मुंबईत होणाऱ्या स्पर्धांसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करुन देण्यात येईल असे सांगून खेळाडूंना उत्तम मूलभूत सोयी-सुविधा पुरविणे, आरोग्य सुविधा, तसेच स्पर्धा कालावधी दरम्यान मुंबई शहरातील वाहतूक व्यवस्थेचा संबंधित यंत्रणांमार्फत नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

मुंबई शहरातील आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरावर आपले क्रीडा नैपुण्य दाखवित असलेल्या खेळाडूंना स्पर्धेत अधिकाधिक संधी प्राप्त व्हावी, स्पर्धेच्या दृष्टीने खेळाडूंची तयारी व्हावी, उद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्ह्याचा वार्षिक क्रीडा आराखडा तयार करुन नियोजन करावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत सांगीतले.

मुंबई शहरात (दि. ४) ते ८ जानेवारी २०२३ या कालावधीत इंडियन जिमखाना, डॉन बास्को स्कूल किंग्ज सर्कल, माटुंगा येथे बास्केटबॉल स्पर्धा होईल. (दि.१०) ते १४ जानेवारी या कालावधीत गिरगांव चौपाटी येथे याटिंग क्रीडास्पर्धा होईल.

आज ३० डिसेंबर रोजी गेट वे ऑफ इंडिया येथून सकाळी ७.३० वा. क्रीडा ज्योत रॅलीस प्रारंभ होणार आहे. या रॅलीमध्ये मुंबई शहर जिल्ह्यातील क्रीडा पुरस्कारप्राप्त नामांकित खेळाडू, एनसीसी कॅडेटस्, आर्मी याटिंग नोडचे क्रीडापटू, क्रीडा अधिकारी, नेहरु युवा केंद्राचे खेळाडू विविध शाळांतील उद्योन्मुख खेळाडू अशा सुमारे ५०० क्रीडापटूंचा सहभाग असेल. या स्पर्धा मुंबईसह राज्यातील नाशिक, नागपूर, जळगांव, अमरावती, औरगांबाद या जिल्ह्यांमध्ये होणार आहेत. या स्पर्धांमुळे आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांकरिता खेळाडूंना उत्तम कामगिरी करण्याची संधी मिळणार आहे.

या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अभय चव्हाण, सर जे. जे. रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संजय सुरासे, वैद्यकीय अधिकारी डॉ. चित्रा सर्वराज, डॉ. दिलीप गवारी, बास्केटबॉल छत्रपती पुरस्कार विजेता मुकुंद धस, महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेचे गोविंद मथ्युकुमार, महाराष्ट्र ऑलिंपिक असोशिएशनचे संजय शेटे, प्रदीप गंधे, बॉक्सिंग क्षेत्रातील जय कवळी आदी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आढळरावांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही; सचिन अहिर

वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात…

1 दिवस ago

इंडिया आघाडी अतिरेक्यांची भाषा बोलू लागली; देवेंद्र फडणवीस

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी शिरुर येथे मंगळवार…

1 दिवस ago

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिरुर (तेजस फडके) 'गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवत आहात. तुम्ही १५ वर्षे खासदार असताना…

2 दिवस ago

शिरुर ग्रामीण मध्ये डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकत दोन गांजा विक्रेते तसेच गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर केली कारवाई

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औ‌द्योगीक वसाहतीमध्ये काही ठिकाणी अवैधरीत्या गांजाची चोरुन…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी संतोष सुभाष चौधरी यांनी विषारी औषध…

4 दिवस ago