महाराष्ट्र

‘खाऊन दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’, असे म्हणत शिवसेनेकडून उद्धव ठाकरेची व्यंगचित्राद्वारे उडवली खिल्ली

रेहमान डकैत थीमद्वारे आदित्य ठाकरेंच्या ‘करून दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’ या वरळीच्या घोषणेचा उडवला फज्जा

मुंबई: ‘खाऊन दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’ असे म्हणत शिवसेनेने व्यंगचित्राद्वारे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची खिल्ली उडवली आहे. वरळीमध्ये आज आदित्य ठाकरेंच्या सभेत ‘करून दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’ या नाऱ्याची घोषणा केली जाणार आहे. मात्र, शिवसेनेने त्यांच्या या घोषणेचा फज्जा उडवून सध्या चर्चेत असलेल्या ‘रेहमान डकैत’ या धुरंधर सिनेमामधील पात्राचा आधार घेत टीका केली आहे.

मुंबईसह राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा नुकतीच झाली असून राजकीय वातावरण तापण्यासही सुरुवात झाली आहे. यानिमित्तानेच, शिवसेनेनेही २५ वर्षे मुंबईवर सत्ता गाजवणाऱ्या उबाठा गटावर टीका करणारे व्यंगचित्र सोशल मीडियावर प्रसिद्ध केले आहे. वरळीमध्ये आज आदित्य ठाकरे ‘करून दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’ अशी घोषणा सभेमध्ये देणार आहेत. मात्र, नेमका त्यांच्या याच घोषणेचा फज्जा शिवसेनेने व्यंंगचित्राद्वारे उडवला. त्यांनी यात धुरंधर सिनेमातील गाजत असलेल्या रेहमान डकैत या पात्राचा आधार घेत उद्धव ठाकरेंचे एक व्यंगचित्र काढले आहे. त्यात हे पात्र ‘खाऊन दाखवलंय हे अभिमानाने सांगूया’ असं म्हणत असून, त्याला घाबरून संजय राऊत व आदित्य ठाकरे खाऊन नव्हे करून म्हणा असे सांगताना दिसत आहेत.

गेल्या २५ वर्षांत उबाठा गटाने मुंबई महापालिकेवर सत्ता गाजवली त्यात सव्वा लाख कोटींचा गैरव्यवहार केल्याचा आरोप आज भाजपकडून झाला असतानाच हे व्यंगचित्र बाहेर आले आहे. मात्र, सध्या सोशल मीडियावर हे व्यंगचित्र व्हायरल झाले असून अनेक जण उबाठा गटावर टीका करताना दिसत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

10 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

10 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

10 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

14 तास ago