आरोग्य

जास्त जगण्याचं रहस्य

जे लोक १०० वर्ष जगतात, ते कसे जगतात किंवा इतकी वर्ष जगण्यासाठी त्यांनी काय केलं, हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्या मध्येच असते. कुणालाही असंच वाटत असतं की, त्यांनी जास्तीत जास्त जगावं, १०० वर्ष जगावं.

मात्र आजकालची लाइफस्टाईल, खाणं-पिणं इतकं बदललं आहे की, १०० वर्ष जगण्याचा विचारही कुणाच्या मनात येत नाही. पण जे लोक १०० वर्ष जगतात, ते कसे जगतात किंवा इतकी वर्ष जगण्यासाठी त्यांनी काय केलं? हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांमध्येच असते. जेणेकरून त्यांनाही त्या गोष्टी फॉलो करून इतकं जगता यावं. तर १०० वर्ष कसं जगता येईल हे एका १०० वर्षाच्या डॉक्टरांनी सांगितलं आहे. महिला डॉक्टर ग्लेडिस मॅकगॅरी यांचं वय १०३ वर्ष आहे. या वयातही त्या फार सक्रिय आहेत. त्यांनी ‘द वेल लिव्ड लाइफ : ए 103 ईअर ओल्ड डॉक्टर्स सीक्रेट्स टू हेल्थ अँड हॅपीनेस अ‍ॅट एवरी एज’ नावाचं पुस्तक लिहिलं आणि यात त्यांनी जास्त आयुष्य जगण्याचं रहस्य सांगितले आहेत. अशात त्यांच्या इतकं जगण्याचं रहस्य काय आहे.

नवीन शिकत रहा: आपल्या पैकी सगळ्यांनी काहीना काही नवीन शिकणे, पुढे जाणे आणि आपल्या क्वालिटी वाढवण्याचं काम केलं पाहिजे. यामुळे तुम्ही सजग राहता.

स्वत:वर प्रेम करा: जगात प्रत्येक दोन पैकी एक व्यक्ती डिप्रेशनचा शिकार आहे. हे लोक स्वत:वर फार कमी प्रेम करतात. त्यामुळे जास्त जीवन जगण्यासाठी आधी तुम्ही स्वत: प्रेम करायला शिका.

एनर्जी वाया घालवू नका: तुमची एनर्जी अशा गोष्टीवर घालवा, जी गोष्ट तुम्हाला आवडते किंवा आनंद देते. हे काही फार अवघड काम नाही. जेव्हा या पद्धतीने आपण जीवन जगत असतो, तेव्हा खरंच आपण जीवन जगत असतो.

काय खावे: प्लांट बेस्ड डाएट फॉलो केला पाहिजे. म्हणजे झाडांपासून बनलेले पदार्थ, हिरव्या पालेभाज्या, फळं इत्यादींचं सेवन केलं पहिजे. तसेच भरपूर पाणी प्यायला हवं. याने तुमचं आयुष्य वाढू शकतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जगाला गवसणी घालणारा भारत; 2047 पर्यंत महासत्ता होण्यासाठी राष्ट्रीय रोडमॅप

नवी दिल्ली : भारताला 2047 पर्यंत विकसित, समृद्ध, सुरक्षित, तंत्रज्ञानसमृद्ध आणि जगाच्या विकासात नेतृत्व करणारी…

1 तास ago

एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तक समितीवरून महेश तपासेंचा केंद्रावर हल्लाबोल

‘अभ्यासक्रम सुधारणा नव्हे, वैचारिक ताबा मिळविण्याचा प्रयत्न’; आरएसएस-भाजपशी संबंधित व्यक्तींच्या नियुक्तीचा आरोप मुंबई: इयत्ता ११ वी…

2 तास ago

पिंपळवंडीतील घटनेने संताप; वैशाली नागवडे यांनी घेतली पीडित कुटुंबीयांची भेट

मुंबई: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे घडलेल्या संतापजनक घटनेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली नागवडे यांनी…

3 तास ago

‘धनुष्यबाण’ गोठवण्याच्या मागणीवरून शिवसेनेचा उबाठावर बोचरा प्रहार

मुंबई : शिवसेनेचे पक्षचिन्ह ‘धनुष्यबाण’ गोठवण्याची मागणी उबाठा गटाने न्यायालयात केल्यानंतर शिवसेनेने सोशल मीडियावर बोचरे…

3 तास ago

‘छात्रों की गुंज’साठी पुण्यात काँग्रेसची जोरदार तयारी; भाजपवर हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल

पुणे: विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’…

3 तास ago

शहरांच्या बकालपणावर काँग्रेसचा हल्लाबोल; ‘शहर परिवर्तन गटा’चा शुभारंभ

मुंबई: विकासाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर निधी खर्च होत असतानाही अनेक शहरांचे बकाल रूप झाले आहे.…

3 तास ago