महाराष्ट्र

महिलांचा सन्मान आणि सुरक्षा करुन सरकार चालवू…

मुंबई: महिलांचा सन्मान आणि सुरक्षा करुन सरकार चालवू असे आश्वासन नरेंद्र मोदींनी २०१४ मध्ये देशातील जनतेला दिले होते परंतु आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात आंदोलन करणार्‍या महिला कुस्तीपटूंवर पोलिसी बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा दिल्लीत जंतरमंतरवर जो प्रकार झाला त्याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे.

गेले दहा दिवस दिल्लीच्या जंतरमंतरवर महिला कुस्तीपटू आंदोलनाला बसल्या आहेत. काल मध्यरात्री पोलिसांनी पाऊस सुरु असताना लाठीचार्ज केला आणि शिवीगाळ करून आंदोलनाचा अधिकार मोडण्याचा प्रयत्न केंद्रातील भाजप सरकारच्या पोलीसांनी केला याबद्दल महेश तपासे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या महिला कुस्तीपटूंना न्याय मिळावा, त्यांच्या प्रश्नांना वाचा फुटावी आणि त्यांच्या मागण्यांवर यथोचित कारवाई व्हावी अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची आहे, असेही महेश तपासे म्हणाले.

देशातील बेरोजगारीचा एक डेटा प्रसिद्ध झाला असून त्यात चार महिन्यांचा उच्चांक बेरोजगारीने मोडला आहे. दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करु आणि देशात ‘अच्छे दिन’ आणू असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. परंतु दिवसेंदिवस पाहिले तर बेरोजगारीचा आलेख वाढतच चालला आहे. रोजगाराची संधी उपलब्ध नाही. कनिष्ठ पदावर उच्चशिक्षित लोक येऊ लागले आहेत. याचा अर्थ बेरोजगारी आटोक्यात आणण्यामध्ये भाजपसरकार फेल ठरले आहे, असा आरोपही महेश तपासे यांनी केला आहे.

या देशातील बेरोजगारी पंतप्रधान नरेंद्र मोदी दूर करु शकत नाहीत त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत देशातील सुशिक्षित तरुण बेरोजगार हा मोदींच्या भुलथापांना बळी न पडता भाजपला मतदान करणार नाही, असा दावाही महेश तपासे यांनी केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

26 मिनिटे ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

30 मिनिटे ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

41 मिनिटे ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

9 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

9 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

9 तास ago