मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत “लोकल टू ग्लोबल” या दृष्टिकोनाला बळ दिले आहे. या दौऱ्यात त्यांनी “Strategies for Inclusive Growth” या विशेष कार्यक्रमात सहभाग घेतला.
जागतिक स्तरावर सार्वजनिक धोरण, प्रशासन आणि नेतृत्व विकासासाठी ओळखल्या जाणाऱ्या हार्वर्ड केनेडी स्कूलमध्ये डॉ. शिंदे यांनी Public Policy, Governance आणि Leadership या क्षेत्रांतील आपली समज अधिक व्यापक केली. या शिक्षणामुळे त्यांच्या नेतृत्वशैलीत आधुनिकता आणि सर्वसमावेशकतेचा दृष्टिकोन अधिक मजबूत झाल्याचे दिसून येत आहे.
“Strategies for Inclusive Growth” या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आर्थिक वाढ समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचवणे, सामाजिक-आर्थिक विषमता कमी करणे आणि रोजगार व शिक्षणाच्या संधी सर्वांसाठी उपलब्ध करून देणे हा आहे. या अनुभवातून डॉ. शिंदे यांनी समावेशक विकासाची संकल्पना आत्मसात केली असून, भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशासाठी ही दृष्टी महत्त्वाची ठरणार आहे.
या अभ्यासदौऱ्यामुळे भविष्यातील धोरणनिर्मितीत अधिक परिणामकारकता येईल, तसेच समाजातील दुर्बल घटकांच्या गरजा ओळखून विकास अधिक संतुलित करण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.युवा पिढीसाठीही हा प्रवास प्रेरणादायी ठरत असून, मोठी स्वप्ने पाहणे, सतत शिकत राहणे आणि समाजासाठी कार्य करण्याची जाणीव ठेवणे हा संदेश या माध्यमातून दिला गेला आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…
१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…
लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…
नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…
चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…
राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…