महाराष्ट्र

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून संबंध ठेवत फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपांवरून अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे पालिका प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.

विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करून शुक्ला यांना ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपी आणि तक्रारदार महिला यांची ओळख विक्रोळीतील बिल्डिंग प्रपोजल विभागात काम करत असताना झाली. कामाच्या निमित्ताने सुरू झालेली ओळख पुढे वैयक्तिक जवळिकीमध्ये बदलली.

दरम्यान, शुक्ला यांनी आपल्या वैवाहिक आयुष्यात अडचणी असल्याचे सांगत पत्नीपासून विभक्त होण्याचा विचार असल्याचे महिलेच्या विश्वासात दिले. याच वेळी त्यांनी लग्नाचे आश्वासन देत संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे.

मात्र कालांतराने शुक्ला यांनी लग्नाचा विषय टाळण्यास सुरुवात केल्याने संबंधित महिलेने पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीनंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ६९ अंतर्गत गुन्हा नोंदवला असून सध्या आरोपीची सखोल चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान आणखी माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, नितीन शुक्ला यांनी यापूर्वी एफ-नॉर्थ वॉर्डमध्ये प्रभाग अधिकारी म्हणून काम केले होते. त्यानंतर त्यांच्याकडे के-ईस्ट वॉर्डचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता आणि पुढे त्यांची सहायक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती.या घटनेमुळे पालिका प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू; एक जखमी…

मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…

1 तास ago

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

8 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

9 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

1 दिवस ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago