महाराष्ट्र

मी कोणाला छेडत नाही पण मला छेडलं तर कोणाला सोडत नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘म’ मराठीचा नव्हे तर मलिदा आणि मतलबाचा

मुंबई: बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेलो मी प्रामाणिक कार्यकर्ता आहे, मी कोणाला छेडत नाही, पण मला छेडलं तर कोणाला सोडत नाही, असा निर्वाणीचा इशारा शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा गटाला आज दिला. विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. भरलेल्या ताटाचे विचारता पण जनतेच्या मतांची माती कोणी केली, देवेंद्रजींच्या पाठित खंजीर कोणी खुपसला, असे प्रतिप्रश्न उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी उबाठाला केले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मराठी माणूस मराठी भाषा आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व आमचा प्राण आहे. पालिका निवडणुका जवळ आल्या की मराठीबद्दल, महाराष्ट्राबद्दल आणि मुंबईबद्दल जो काही अपप्रचार होतो तो सगळ्यांना अवगत झालाय. वरुन किर्तन आणि आतून तमाशा, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. मराठीचं प्रेम आम्हाला शिकवण्याची गरज नाही. जन्मलो मराठी, मराठीसाठीच जगणार आणि मराठीसाठीच खपणार, असे ते म्हणाले.

मराठी माणूस तुमच्या फेक नरेटिव्हला आता फसणार नाही. कारण तुमच्या तोंडी ‘म’ म्हणजे महापालिकेचा, ‘म’ मलिद्याचा, ‘म’ मतलबाचा आणि ‘म’ मतांचा आहे आणि तुमच्या मनात फक्त मतांचे राजकारण आहे, अशी खरमरीत टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. माझ्याकडे बोलण्यासारखं खूप काही आहे, पण जेव्हा ते बोलतात तेव्हा मी बोलतो. आरोपांना आरोपाने नाही तर कामातून उत्तर देणारा कार्यकर्ता आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. फेसबुकवाले सामोरे जाऊ शकत नाही म्हणून सकाळ दुपार व संध्याकाळ माझ्यावर टीका करतात. माझ्यावर टीका करण्यापूर्वी तुमच्याकडे तीन बोटं आहेत त्याचा विचार करा, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला सुनावले.

ते पुढे म्हणाले की, इतक्या लवकर झटपट रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने पाहिला नाही. ज्यांना कस्पटासमान समजले, संपलेले लोक असल्याचे हिणवले मात्र त्यांच्याच मागे रोज जावे लागतंय, चल मेरे भाई तेरे हाथ जोडतां हू, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला. भरलेल्या ताटाचे विचारता पण निकालानंतर जनतेच्या मतांची माती कोणी केली, असा सवाल उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विचारला. २०१९ च्या निवडणूक निकालानंतर देवेंद्रजींनी ५० फोन केले ते का नाही उचलले. देवेंद्रजींच्या पाठित खंजीर कोणी खुपसला, असे प्रश्न उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित केले. गुवाहाटीला असताना तुम्ही दिल्लीशी संधान बांधण्याचा प्रयत्न करत होतात. आम्ही सत्ता सोडून गेलो. गद्दारी तुम्ही केली, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली.

फडवणीसांमुळे शिवसेनेला मुंबईचे महापौर पद

मुंबई महापालिकेच्या २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला मिळालेलं महापौरपद केवळ आपल्या विनंतीमुळे शिवसेनेला बहाल केलं गेलं, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सभागृहात केला. या घटनेला आमदार मिलिंद नार्वेकर साक्षीदार आहेत, असे ते म्हणाले. भाजपने महापौरपदाची तयार केली होती, मात्र आपण देवेंद्रजींना विनंती केली की महापौरपद सोडा आणि शिवसेनेला द्या, त्यांनी अर्धा तासांत विचार करुन पत्रकार परिषद घेत महापौरपद शिवसेनेला देऊन टाकलं. मात्र २०१९ मध्ये दगा, धोका आणि विश्वासघात करुन त्याची परतफेड केली, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. एक तू राहशील नाहीतर मी, अशी टोकाची भाषा त्यांनी केली. त्यामुळेच त्यांचा कार्यक्रम करावा लागला, असे ते म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago