महाराष्ट्र

एम.फील. अर्हता धारक अध्यापकांना कॅसचे लाभ लागू; चंद्रकांत पाटील

मुंबई: एम. फील. अर्हता धारक अध्यापकांना कॅसचे लाभ लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य एम. फिल. पात्रताधारक प्राध्यापक संघर्ष समितीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन दिले होते. या निवेदनावर आज संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत मंत्रालय मुंबई येथे चर्चा झाली.

विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) च्या (दि. 5) सप्टेंबर 2022 रोजीच्या पत्रानुसार, अध्यापकांना कॅस चे लाभ देण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेऊन नोव्हेंबर 2022 मध्ये सकारात्मक भूमिका घेत विभागाला आवश्यक सूचना दिल्या होत्या त्यानुसार, बहुतांश एम.फील. पदवीधारक अध्यापकांना लाभ देण्यात आले मात्र काही मागण्या विचाराधीन होत्या. त्याबाबत विस्तृत चर्चा होऊन (दि .11) जुलै 2009 पर्यंत सेवेत असताना एम. फिल. केलेल्या सर्व अध्यापकांना कॅसचे लाभ देण्यासंबंधी विद्यापीठ अनुदान आयोगाकडे मार्गदर्शन मागवून अशा सर्व अध्यापकांना लाभ देण्यात यावे, अशा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सूचना दिल्या.

यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उप सचिव अजित बाविस्कर,महाराष्ट्र राज्य एम.फील. पात्रताधारक प्राध्यापक संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ निलेंद्र लोखंडे, डॉ.सचिन गोसावी, डॉ.रमाकांत पाटील ,डॉ.सविता तायडे,डॉ.लता चव्हाण, डॉ. ज्ञानेश्वर बोराडे,डॉ.अभिजित पवार व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

3 तास ago

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

16 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

16 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

16 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

16 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

22 तास ago