महाराष्ट्र

कवलापूर येथे विमानतळाबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाकडून तात्काळ सर्वेक्षण करा

मुंबई: सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे विमानतळ उभारणीबाबतची प्रक्रिया गतीमान करण्यासाठी महाराष्ट्र कार्गो व नागरी विमानतळाकरिता विमानतळ विकास प्राधिकरणाने तात्काळ सर्वेक्षण हाती घ्यावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

आज मंत्रालयात मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांगली जिल्ह्यातील कवलापूर येथे कार्गो विमानतळ व नागरी विमानतळ संदर्भात बैठक झाली. या बैठकीस उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार विशाल पाटील, माजी मंत्री व आमदार सुरेश खाडे, आमदार सत्यजीत कदम, आमदार सुहास बाबर, दूरदृश्य प्रणाली द्वारे जिल्हाधिकारी अशोक काकडे, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाचे अधिकारी आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, कवलापूर येथील ६६.३६ हेक्टर क्षेत्र विमानतळाकरिता उपलब्ध आहे. सांगली जिल्ह्यातील गुंतवणूक व औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी विमानतळ उभारणी महत्त्वाची असून यासाठी प्रलंबित असलेले सर्वेक्षण तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. या प्रकल्पास लागणाऱ्या सर्व प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सांगली जिल्ह्यातील प्रस्तावित नागरी विमानतळामुळे उद्योजक, व्यापारी आणि सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या प्रकल्पामुळे औद्योगिक गुंतवणूक, व्यापार आणि पर्यटन क्षेत्रालाही नवी चालना मिळेल.विमानतळाच्या माध्यमातून जिल्ह्यातील उद्योगांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांशी जोडणी सुलभ होणार असून गुंतवणूक वाढण्यास मदत होईल. तसेच व्यापारी आणि सामान्य प्रवाशांसाठी प्रवास अधिक सोयीस्कर होणार असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

21 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

22 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

22 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

22 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

22 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

22 तास ago