महाराष्ट्र

राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, राहुलजींच्या सुरक्षेत वाढ करा

मुंबई: काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांना गोळ्या घालून मारण्याची धमकी सत्ताधारी भाजपाचे प्रवक्ते प्रिंटो महादेवनने दिली असून हे अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे, त्याला कठोर शिक्षा झाली पाहिजे व राहुलजी गांधी, सोनियाजी गांधी व प्रियंकाजी गांधी यांच्या जीवाला असलेला गंभीर धोका पाहता त्यांना एसपीजी सुरक्षा देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस कार्य समितीचे सदस्य तथा माजी मंत्री नसीम खान यांनी केली आहे.

लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवलेल्या पत्रात नसीम खान पुढे असे म्हणतात की, राहुलजी गांधी हे समाजातील वंचित, मागास, आदिवासी व अल्पसंख्याक समाजाच्या रक्षणासाठी तसेच लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी सातत्याने आवाज उठवत आहेत. सामाजिक न्याय, एकता व बंधुत्वाची भाषा ते करतात. गांधी कुटुंबाला नेहमीच धोका राहिलेला आहे, आता तर गोळ्या घालण्याची थेट धमकी देण्यात आली आहे, ही अत्यंत गंभीर घटना असून याचे गांभिर्य पाहता राहुल गांधी यांच्यासह गांधी कुटुंबाची सुरक्षा वाढवण्याची गरज आहे. अशा गुन्हेगारावर गंभीर कारवाई करा आणि लोकशाहीत अशा कृती खपवून घेतल्या जाणार नाहीत असा कडक संदेश द्या तसेच लोकप्रतिनिधींना निर्भयपणे त्यांचे कर्तव्य पार पाडता आले पाहिजे असेही नसीम खान यांनी म्हटले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

7 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

11 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

11 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

11 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

11 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

11 तास ago