महाराष्ट्र

महाराष्ट्राचा अत्यंत अभ्यासू व कर्तबगार नेता हरपला; मंत्री जयकुमार रावल

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक तसेच सर्व क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात झालेले दुर्दैवी निधन अत्यंत धक्कादायक, वेदनादायी आणि मन सुन्न करणारे आहे. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने एक अत्यंत अभ्यासू, अनुभवी, कर्तबगार, अजातशत्रू आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दांत राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी शोकभावना व्यक्त केल्या.

मंत्री रावल म्हणाले की, अजित पवार यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत राज्याच्या विकासासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. शेती, जलसंपदा, पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास तसेच ग्रामीण भागाच्या उन्नतीसाठी त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. सामान्य माणसाच्या प्रश्नांबाबत ते नेहमीच संवेदनशील होते. कठोर निर्णयक्षमता, प्रशासनावर मजबूत पकड आणि स्पष्टवक्तेपणा ही त्यांच्या नेतृत्वाची प्रमुख ओळख होती.

“माझ्या शालेय जीवनापासून त्यांच्याशी माझा संबंध आणि संवाद होता. पुण्याच्या सिम्बायोसिस कॉलेजमध्ये मी शिक्षण घेत असताना त्यांनी मला बोलावून माझी मुलाखत घेतली होती. पुढे राजकारणात आमदार झाल्यानंतर जिल्ह्यातील विकासाच्या अनेक योजनांसाठी त्यांनी मोलाचे सहकार्य केले. साक्री तालुक्यातील सर्वात मोठ्या सौर ऊर्जा प्रकल्पाची मागणी केल्यानंतर त्यांनी ती मंजूर केली. काल झालेल्या कॅबिनेट बैठकीत राज्यातील सोयाबीन, तूर खरेदी तसेच एकूणच पणन क्षेत्राशी संबंधित विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले,” असेही मंत्री रावल यांनी सांगितले.

त्यांच्या निधनाने केवळ एका राजकीय नेत्याचा नव्हे, तर राज्याच्या विकासप्रक्रियेला दिशा देणाऱ्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला आहे. ही हानी भरून न निघणारी असून महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवेल, असे मंत्री रावल म्हणाले.

या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांप्रती व आप्तस्वकीयांप्रती मी मनःपूर्वक शोकसंवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो व कुटुंबीयांना हे असह्य दुःख सहन करण्याचे बळ देवो, अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

13 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

13 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

13 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

13 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

13 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

17 तास ago