महाराष्ट्र

महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या संपूर्ण संघांचे वेळापत्रक

मुंबई: क्रिकेटमधून मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र प्रीमिअर लीग 2023 हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने मंगळवारी (दि. 13 जून) याची माहिती दिली. या स्पर्धेला 15 जूनपासून सुरुवात होणार आहे. तसेच, स्पर्धेचा अंतिम सामना 29 जून रोजी पार पडणार आहे. हे सर्व सामने पुण्याच्या एमसीए क्रिकेट स्टेडिअम, गहुंजे येथे खेळले जातील.

या स्पर्धेत एकूण 19 सामने खेळले जाणार आहेत. त्यातील 15 साखळी सामने, तर उर्वरित 4 प्ले-ऑफचे सामने असतील. या स्पर्धेत प्रत्येक संघ प्रत्येकी 5 सामने खेळणार आहे. याव्यतिरिक्त स्पर्धेत महिला क्रिकेटचे तीन प्रदर्शनीय सामनेही खेळवले जाणार आहेत.

एमएपीएलचे वेळापत्रक…

15 जून पुणेरी बाप्पा विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)

16 जून:- छत्रपती संभाजी किंग्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स (दुपारी- 2 ते 5.20)

16 जून:- रत्नागिरी जेट्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)

17 जून:- कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)

18 जून:- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (दुपारी – 2 ते 5.20)

18 जून:- छत्रपती संभाजी किंग्स* विरुद्ध पुणेरी बाप्पा, (सायंकाळी – 8 ते 11.20)

19 जून:- पुणेरी बाप्पा विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)

20 जून:- सोलापूर रॉयल्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (दुपारी- 2 ते 5.20)

20 जून:- छत्रपती संभाजी किंग्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)

21 जून:- ईगल नाशिक टायटन्स विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)

22 जून:- छत्रपती संभाजी किंग्स विरुद्ध कोल्हापूर टस्कर्स, (दुपारी – 2 ते 5.20)

22 जून:- पुणेरी बाप्पा विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)

23 जून:- छत्रपती संभाजी किंग्स विरुद्ध सोलापूर रॉयल्स, (सायंकाळी- 8 ते 11.20)

24 जून:- पुणेरी बाप्पा विरुद्ध रत्नागिरी जेट्स, (दुपारी – 2 ते 5.20)

24 जून:- कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स, (सायंकाळी – 8 ते 11.20)

25 जून:- क्वालिफायर 1

26 जून:- एलिमिनेटर

27 जून:- क्वालिफायर 2

29 जून:- अंतिम सामना

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

15 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago