महाराष्ट्र

पुणे येथील आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग सुरू ठेवावा; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: प्रसार भारतीने पुणे येथील आकाशवाणी प्रादेशिक वृत्त विभाग इतरत्र न हलवता तो जेथे आहे तिथेच सुरू ठेवावा. पुणे येथील कार्यालयात वरीष्ठ सनदी अधिकाऱ्याची तात्काळ नेमणूक करण्यात यावी. असे मत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

पुणे वृत्त विभागामार्फत प्रसारित होणारे आकाशवाणीवरील प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातमी पत्र छत्रपती संभाजीनगर वृत्त विभागाकडे सोपविण्यात आले असल्याच्या पार्श्वभूमीवर डॉ. गोऱ्हे यांनी त्यांचे मत व्यक्त केले.

यावेळी डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, तब्बल सात दशके आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रादेशिक आणि राष्ट्रीय मराठी बातमी पत्र प्रसारित केले जाते. सुमारे २.४ दशलक्ष श्रोतावर्ग याचा लाभ घेत आहेत. हा विभाग बंद झाल्यास श्रोत्यांची गैरसोय होईल. पुणे विभागाने अडचणीच्या काळात देखील उत्कृष्ट काम करून दाखवलेले आहे. असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

यापूर्वीदेखील, पुणे आकाशवाणी केंद्रावरील स्थानिक कार्यक्रम रद्द करून मुंबई केंद्रावरील कार्यक्रम प्रक्षेपित करण्याचा प्रसार भारतीचा आदेश तातडीने रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला असल्याचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

लोकप्रिय आकाशवाणी पुणे केंद्र बंद करण्याऐवजी अधिकाधिक सक्षम कसा होईल याकरिता पूर्णवेळ सनदी अधिकारी नियुक्त करण्यात यावा असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले. यासंदर्भात प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी आणि राज्यपाल रमेश बैस यांना पत्र देण्यात आले असल्याचे उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

7 तास ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

7 तास ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

7 तास ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

8 तास ago

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना मतदानाचे आवाहन

बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…

8 तास ago

शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक मोटारी चोरीला; गुन्हा दाखल…

न्हावरे (तेजस फडके): इनामगाव (ता.शिरुर) येथे शेतजमिनीतून दोन विद्युत मोटारी चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली…

13 तास ago