महाराष्ट्र

एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा देण्याबाबतचे धोरण करा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांनी घेतला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा आढावा

मुंबई: एम.आय.डी.सी. असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास या भागातील विकास करता येईल. त्यामुळे अशा गावांना औद्योगिक नगरी देण्यासंदर्भात धोरण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एमआयडीसीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, उपमुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, सचिव नवीन सोना, उद्योग सचिव डॉ. पी.अनबलगन, मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासु, सहमुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की, औद्योगिक क्षेत्राचा विकास अधिक वेगाने करण्यासाठी अशा एमआयडीसी असलेल्या गावांना औद्योगिक नगरीचा दर्जा दिल्यास त्या गावांच्या विकासाबरोबरच संबंधित भागात मूलभूत सुविधा आणि पायाभूत प्रकल्पांचा विकास वेगाने होईल. त्याचप्रमाणे पाणीपुरवठा, रस्ते, वीज आणि इतर सुविधा सुधारणे यावर भर दिला जाईल.

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2025 मध्ये एकूण 63 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या असून यातील 47 करार हे उद्योगाशी संबंधित आहे. यातील कंपन्यांना जमीन वाटपाचे काम पूर्णत्वास जात आहे. नवीन औद्योगिक क्षेत्रांसाठी भूसंपादनाची अधिसूचना प्रकाशित करण्यात येत आहे. ई-निविदा पद्धतीने महाटेंडर्स् पोर्टलवर 654 भूखंडाचे वाटप करण्यात आले असल्याचे यावेळी बैठकीत सांगण्यात आले.

100 दिवस कृती आराखड्यात दिलेल्या कार्यक्रमात महामंडळाने 3500 एकर औद्योगिक भूखंड देण्याच्या उद्दिष्टांपैकी 2346 एकर औद्योगिक भूखंड उद्योगांना वाटप करण्यात आले आहे. जमीन अधिग्रहणाचे 110 टक्के उद्दिष्ट पूर्ण केले आहे. बुटीबोरी येथे 5 एमएलडी सांडपाणी प्रकल्प कार्यान्वित झाला असून औद्योगिक सेवांच्या विनंती, तक्रारी आणि मंजुरीच्या अर्जाचे निराकरण करण्यात आले असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘ज्ञानाचा महासागर हरपला’; डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाने महाराष्ट्राची मोठी हानी; एकनाथ शिंदे

कोल्हापुरात पार्थिवाचे घेतले अंतिम दर्शन; शिक्षण, समाजसेवा आणि वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाला भावपूर्ण श्रद्धांजली कोल्हापूर :…

7 तास ago

पुणे–नाशिक सरळ रेल्वेसाठी तज्ज्ञ समिती स्थापन; सत्यजीत तांबे यांनी केला निर्णयाचे स्वागत

६० दिवसांत अहवाल सादर होणार; ९ ऑगस्टचे जनआंदोलन नियोजितप्रमाणेच होणार मुंबई: पुणे–नाशिक सरळ रेल्वे प्रकल्पाच्या…

8 तास ago

घोडनदी बार असोसिएशनची निवडणूक वादाच्या भोवऱ्यात; बोगस मतदान झाल्याचा गंभीर आरोप

निवडणूक प्रक्रिया रद्द करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी; चौकशी पुर्ण होईपर्यंत निकाल व पुढील प्रक्रिया…

8 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे; सुनिल तटकरे यांच्याकडून नियुक्ती जाहीर

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी प्रदेशाध्यक्षपदी ॲड. चिन्मय गाढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय…

11 तास ago

म्हाडाच्या प्रलंबित प्रकल्पांना गती; मोठी घरांची लॉटरी लवकर जाहीर करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश

'फर्स्ट कम, फर्स्ट सर्व्ह' तत्त्वावर रिक्त घरांची विक्री; शिरूर, खराबवाडी, दापोडी, म्हाळुंगे-इंगळे आणि सांगलीतील प्रकल्पांना…

11 तास ago

एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या महिला तलाठीवर पुन्हा लाचेचा गुन्हा; महसूल विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

कोरेगाव भीमा येथे पूर्वीही एसीबीची कारवाई; आता पुण्यात १० लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा, देखरेखीवर…

12 तास ago