मुंबई: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांच्या मृत्यूच्या बातम्यांवर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
याचदरम्यान इराणी वंशाची अभिनेत्री मंदाना करिमी हिने केलेल्या वक्तव्यांमुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. खामेनेई यांच्या मृत्यूवर आनंद व्यक्त केल्यानंतर आता तिने भारत सोडून मायदेशी इराणला जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
‘भाग जॉनी’ या चित्रपटात झळकलेली मंदाना करिमीन म्हणाली, “सुरक्षेच्या कारणास्तव मी भारत सोडत आहे. फार कमी वयात मी इथे आले आणि आता इथून जाण्याची वेळ आली आहे. इराणबद्दल मोकळेपणाने बोलल्यामुळे गेल्या दोन महिन्यांत मला खूप एकटेपणा जाणवला. अनेक मित्रमैत्रिणी दुरावले.”
तिने पुढे सांगितले की, “अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात भारताने मला अनेक संधी दिल्या. त्यासाठी मी कायम आभारी राहीन. मात्र इराणमध्ये बदल घडत असतील आणि महिलांना स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता असेल, तर मी परत जाण्यास तयार आहे. मी स्वतंत्र इराणचे स्वप्न पाहते, जिथे महिलांना शिक्षण आणि आयुष्याविषयी स्वनिर्णयाचा अधिकार असेल.”
भारतीय प्रेक्षकांमध्ये मंदानाला खरी ओळख बिग बॉस या लोकप्रिय रिअॅलिटी शोमुळे मिळाली. या शोच्या नवव्या पर्वात ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. त्यानंतर तिला काही हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली.मंदानाच्या या विधानांमुळे सोशल मीडियावर तीव्र चर्चा रंगली असून तिच्या निर्णयावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…