महाराष्ट्र

बेळगावमधील अनेक मठाधिपतींचा शिवसेनेत प्रवेश; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कर्नाटकात शिवसेना पक्ष वाढीला मिळणार चालना

ठाणे: हिंदुत्वाचे विचार पुढे घेऊन जाणारे शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील अनेक मठाधिपतींनी आज शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. दत्त गगनगिरी ध्यानमंदीराचे मठाधिपती प.पु. पुरषोत्तम माळी महाराज यांच्या नेतृत्वात कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी येथील १२ महाराजांनी रविवारी संध्याकाळी ठाणे येथे आनंद आश्रम येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्ष प्रवेशाने बेळगावात शिवसेना पक्ष वाढीला चालना मिळणार आहे.

आज प.पु. पुरषोत्तम माळी महाराज यांच्यासह सागर बागडी महाराज, नूतन धनावडे महाराज, बाळकृष्ण कांबळे महाराज, सुवेल शेट्टे महाराज, मयुर गुरव महाराज, साई पाटील महाराज, अनिकेत वरके महाराज, सुषमा खरात महाराज, दिपा फडणवीस महाराज, अरविंद शिरळाकर महाराज, दादा महाराज, अजय घराडे महाराज यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेतला.

यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मागील तीन वर्षांपासून लोकांचा शिवसेनेकडे ओढा वाढत आहे. हिंदुत्व आणि विकासाचा विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय, असे ते म्हणाले. महाराष्ट्र हा साधुसंताचा आहे, मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात दोन साधुंची हत्या देशाने पाहिली, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. साधुसंतांच्या पाठिशी शिवसेना खंबीरपणे उभी आहे, हिंदुत्वाचा पुढे घेऊन जाण्याचे काम आधात्मातून सर्व साधु संन्यासीजन करत आहेत. राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान हे वरचे आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

महाराष्ट्रात मराठी आणि देशात हिंदी हा बाळासाहेबांचा विचार होता, मात्र आता काहीजणांनी हिंदुत्व सोयीचे केले. हिंदुत्वाशी आणि सनातन धर्माची प्रतारणा करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला, अशी टीका उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठावर केली. साधुसंतांचे आणि शिवसेनेचे विचार एकच आहेत. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकात आणि देशभरात हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे जाऊया, शिवसेना संतांच्या पाठिशी आहे, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर शहरात पहाटे गोळीबार; घरात शिरलेल्या सशस्त्र चोराला रोखण्यासाठी बाप-लेकीचा प्रतिकार…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…

14 तास ago

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

1 दिवस ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

1 दिवस ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

1 दिवस ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

1 दिवस ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago