महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ‘मराठी भाषा दिवस’ साजरा होणार

डॉ. राम सुतार, मधु मंगेश कर्णिक, अशोक सराफ, दिलीप वेंगसरकर, सयाजी शिंदे, वैशाली सामंत, इंद्रनील चितळे यांचा होणार सन्मान…

मुंबई: मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली.

अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे जगद्विख्यात शिल्पकार पद्मविभूषण डॉ. राम सुतार, पद्मश्री कविवर्य मधु मंगेश कर्णिक, पद्मश्री अशोक सराफ, क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर, पर्यावरण प्रेमी अभिनेते सयाजी शिंदे, प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत, युवा उद्योजक इंद्रनील चितळे आदींचा सन्मान करण्यात येणार आहे.

चेंबुर येथील दि फाईन आर्ट सोसायटी, शिवा स्वामी ऑडिटोरियम, फाईन आर्ट चौक येथे सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत होणार्‍या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील उपस्थित राहणार आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे भूषविणार आहेत. याशिवाय पक्षाचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदारही उपस्थित राहणार आहेत. याशिवाय अशोक हांडे प्रस्तुत ‘मराठी बाणा’ संगीत कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बाह्य राजकीय हस्तक्षेपाला आळा; पारदर्शक निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित

मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी…

11 तास ago

तृणमूलच्या पक्षचिन्ह वादात शिवसेना प्रकरणाचा दाखला; सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला ‘विलंबा’वरून सवाल

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसमधील पक्षचिन्हाच्या वादावर गुरुवारी सुप्रीम कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान शिवसेना पक्षातील वादाचा…

11 तास ago

दिशा सालियान प्रकरणावर सूरज पांचोलीची मोठी पोस्ट; म्हणाला…

मुंबई : दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणावर अभिनेता सूरज पांचोलीने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट…

11 तास ago

नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू; घरामागे आढळला १८ वर्षीय हरिणीचा मृतदेह

तेलंगणातील भद्राद्री कोठगुडेम जिल्ह्यात खळबळ; शरीरावर जखमांच्या खुणा, शेजाऱ्यावर संशय; पोलिसांकडून सखोल तपास सुरू तेलंगणा:…

11 तास ago

पंतप्रधानांच्या हस्ते प्रेरणास्थळाचे उद्घाटन; एआय संस्थेचीही पाहणी, शरद पवारांनी घेतला तयारीचा आढावा

बारामती: गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बारामती दौऱ्याची तारीख अखेर निश्चित…

12 तास ago

कलाकारांना मुंढेंचा इशारा; ‘लोकप्रियता म्हणजे कायद्यापासून संरक्षण नव्हे’

मुंबई : आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकणाऱ्या उत्पादनांच्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवर महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाने…

12 तास ago