सोलापूर: सोलापूर शहरातील जुन्या विडी घरकुल परिसरातील गाडगी नगरात गुरुवारी एक हृदयद्रावक घटना घडली. घरातील एअर कंडिशनर (AC) मध्ये झालेल्या स्फोटामुळे ४० वर्षीय विवाहित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मृत महिलेचे नाव पल्लवी प्रवीण सग्गम असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी त्या आपल्या घरात बसल्या असताना अचानक एसीचा स्फोट झाला. स्फोटानंतर तत्काळ शॉर्टसर्किट होऊन घरभर झपाट्याने आग पसरली. आगीच्या ज्वाळा एवढ्या भीषण होत्या, की पल्लवी सग्गम यांना घरातून बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. दरम्यान, आजूबाजूच्या रहिवाशांनी आग लागल्याचे पाहताच आरडाओरडा सुरू केला आणि तातडीने पोलिस तसेच अग्निशमन दलाला कळवले.
अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होताच आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अनेक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. घराची तपासणी केल्यानंतर पल्लवी सग्गम यांचा मृतदेह पूर्णपणे होरपळलेल्या अवस्थेत आढळला.
शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…
मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…
राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…
मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…
संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…
मुंबई: काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाचा सिलसिला सलग दुसऱ्या दिवशीही सुरू राहिला. काँग्रेसचे नवनियुक्त प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद…