राजकीय

राज्यात काँग्रेसला आणखी एक जबर धक्का, नेता हाजरो कार्यकर्त्यांसह करणार भाजपात प्रवेश

मुंबई: विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा सपाटून पराभव झाला होता. महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावं लागलं. तर दुसरीकडे मात्र लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीनं जोरदार पुनरागमन केल्याचं पाहायला मिळालं.

महायुतीला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळालं. दरम्यान या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे, तर दुसरीकडे काँग्रेस नेते भाजपात प्रवेश करत असल्याचं पहायला मिळत आहे.

राज्यात आता आणखी एक मोठा धक्का काँग्रेसला बसला आहे. अमरावतीच्या वरुड मतदारसंघातील काँग्रेसचे माजी आमदार नरेशचंद्र ठाकरे यांचे सुपुत्र विक्रम ठाकरे काही वेळातच भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजप नेते, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत आपल्या हजारो समर्थकांसह विक्रम ठाकरे हे भाजपात प्रवेश करणार आहेत. अलीकडेच विक्रम ठाकरे यांनी अपक्ष विधानसभेची निवडणूक देखील लढवली होती. या कार्यक्रमाला खासदार अनिल बोंडे, आमदार उमेश यावलकर यांची देखील उपस्थिती असणार आहे.

दरम्यान दुसरीकडे काँग्रेसला जळगावात देखील मोठा धक्का बसला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज आणि उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. जळगावच्या शिवतीर्थ मैदानावर अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा तसेच सभा पार पडणार आहे. याच कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांच्यासह तब्बल वीस ते पंचवीस हजार आदिवासी कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. हा काँग्रेससाठी राज्यात मोठा धक्का मानला जात आहे. प्रतिभा शिंदे यांनी काही दिवसांपूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता, त्या आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. राजीनामा दिल्यानंतर त्यांनी नाराजी देखील व्यक्त केली होती, पदावर असूनही काम करता येत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. पुढील काही दिवसांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात, त्यापूर्वीच काँग्रेसला हा मोठा धक्का बसला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

8 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

12 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

12 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

12 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

12 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

12 तास ago