पुणे: सासरच्या लोकांनी अघोरी प्रथा पाळून एका २२ वर्षीय विवाहितेवर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याची धक्कादायक तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री विवाहितेस नग्न होऊन झोपण्यास भाग पाडणे, मुलावर संशय घेऊन अघोरी चाचणी घेण्यास भाग पाडणे यांसारखे प्रकार तिच्यासोबत घडल्याचे तिने फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी सासरच्या मंडळींविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र नरबळी व अघोरी प्रथा प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हडपसर भागातील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीत असे नमूद केले आहे की, सासरच्या मंडळींनी तिच्यावर अघोरी आणि अमानुष प्रकार केले. लग्नानंतर काही महिन्यांनीच तिच्या वागण्यात दोष असल्याचा आणि तिच्यावर भूतबाधा झाल्याचा कुटुंबीयांचा गैरसमज निर्माण झाला. त्यानंतर अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री नग्न अवस्थेत झोपण्यास भाग पाडले गेले. तिच्या शरीरावर लिंबू ठेवणे, राख फासणे, विविध अघोरी चाचण्या घेणे, अंगावर मंत्र पुटपुटणे असे प्रकार वारंवार घडू लागले. यामुळे तिच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर गंभीर परिणाम झाला.
फिर्यादीत आणखी एका धक्कादायक गोष्टीचा उल्लेख आहे. विवाहितेस झालेलं मूल हे पतीचं नसून त्याची पितृत्त्व चाचणी करून अघोरी पद्धतीने सिद्ध करावी, असा अजब हट्ट सासरच्यांनी धरला. यामुळे विवाहितेची प्रचंड मानसिक कुचंबणा झाली. या सगळ्या प्रकारांनंतर तिने सासरी नांदण्यास स्पष्ट नकार दिला.
हडपसर पोलीस ठाण्याने या प्रकरणी सासू, सासरे, पती आणि इतर संबंधित नातेवाईकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यासोबतच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३ अंतर्गतही कठोर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, विवाहितेचे जबाब नोंदवले जात आहेत. काही पुरावेही पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते.
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…
मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…
बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…
निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…