महाराष्ट्र

अजित पवार म्हणाले कुठून उठलो अन् मी पुण्याचा पालकमंत्री झालो

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. पण दोन्ही जिल्ह्यामध्ये काम आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे अजितदादांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे.

दोन दिवसांपूर्वी बीडमध्ये बोलताना अजित पवार वैतागले होते. त्यानंतर आता पुणेकरांच्या थेट प्रश्नामुळे अजित पवार यांनी तर ‘कुठून उठलो आणि पुण्याचा पालकमंत्री झालो’, असे वैतागून बोलून धन्यवाद मानले.

पिंपरी शहरातील वृक्ष तोडी संदर्भात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी हजेरी लावली. अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडच्या विकासावर भर देत जोरदार भाषण केले. पण भाषण जसं संपत आलं, तसं सभागृहामधून एक व्यक्ती उभी राहिली आणि शहरात कशा प्रकारे वृक्षतोड सुरू आहे, अशी माहिती दिली आणि पालकमंत्री म्हणून तुम्ही हे बंद करावे, अशी विनंती केली.

सामाजिक कार्यकर्त्याचं सगळू ऐकून घेतल्यानंतर अजित पवार म्हणाले की, कुठून उठलो अन् मी पुण्याचा पालकमंत्री झालो. कुणीही उठते आणि मला उपदेश करायला लागतं. सगळा मक्ता मीच घेतला. उपदेश करायचे, ठीक आहे, धन्यवाद’ असे म्हणून हात जोडून भाषण आटोपतं घेतले. अजितदादांच्या याा वक्तव्यामुळे सभागृहात मात्र एकच हश्शा पिकला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

2 तास ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

13 तास ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

14 तास ago

संतुलित आरोग्यासाठी मेडिटेशन करण्याचे फायदे

आरोग्य संतुलित ठेवण्यासाठी अनेकदा डॉक्टर मेडिटेशन करण्याचा सल्ला देतात. मेडिटेशन हे केवळ मानसिक नव्हे तर…

17 तास ago

जिमला जायला वेळ नाही? बेली फॅट कमी करण्यासाठी फॉलो करा या सोप्या गोष्टी

पोटावर वाढलेली चरबी आपला पूर्ण लूक खराब करू शकते. हट्टी बेली फॅट कमी करण्यासाठी बऱ्याच…

17 तास ago

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या लग्नासाठी शिवसेनेचा मदतीचा हात; एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

मुंबई : राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी कुटुंबांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाची घोषणा…

17 तास ago