महाराष्ट्र

MD च्या स्वप्नाला ब्रेक! MBBS झालेल्या डॉक्टरची आत्महत्या

नागपूर: शहरातील एका हॉटेलमध्ये सोमवारी सकाळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) नेत्ररोग विभागातील निवासी डॉक्टर ऋत्विक सागर ठाकूर (वय २६) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले.

बुलढाणा (चिखली) येथील रहिवासी ऋत्विकने मुंबईतील सेठ जी.एस. मेडिकल कॉलेज व के.ई.एम. रुग्णालयातून एमबीबीएस पूर्ण केले होते. वडील डॉ. सागर ठाकूर व आई दोघेही डॉक्टर असून, बहीण देखील मेडिकलमध्ये एमबीबीएस करत आहे. ऋत्विकला नागपूर मेडिकलच्या नेत्ररोग विभागात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळाला होता आणि २७ जानेवारी २०२६ रोजी तो कॉलेजमध्ये रुजू झाला होता. विभागप्रमुख डॉ. दिलीप उमरे यांच्या युनिटमध्ये तो कार्यरत होता.

सध्या गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानकाजवळील एका खासगी हॉटेलमध्ये राहत असलेल्या ऋत्विकने सोमवारी कॉलेजला हजर न राहिल्यामुळे डॉ. कुमरे यांनी वडीलांशी संपर्क साधला. मुलाशी फोन करूनही प्रतिसाद न मिळाल्याने हॉटेल व्यवस्थापनाशी संपर्क केला गेला. कर्मचाऱ्यांकडूनही काही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांना कळवण्यात आले.

पोलिसांनी खोलीत प्रवेश केल्यावर ऋत्विकने गळफास घेतल्याचे आढळले. काही सहकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, एमडी मेडिसिनमध्ये प्रवेश घेण्याची योजना असताना जागा उपलब्ध न झाल्याने त्याला नेत्ररोग विभागात प्रवेश घ्यावा लागला, ज्यामुळे तणाव निर्माण झाला असावा. मात्र आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ऋत्विकचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मेडिकलमध्ये पाठविण्यात आला. विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमातील शोकाकुल विद्यार्थी शवविच्छेदन विभागासमोर प्रतीक्षा करत होते. सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक तसेच प्राध्यापक पोलिसांच्या प्रतीक्षेत होते. अखेर रात्री १०.३० वाजता शवविच्छेदन झाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

16 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

1 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago