महाराष्ट्र

CSMT परिसरात हरवलेल्या ८ वर्षीय बालिकेचा तासाभरात शोध; महिला फौजदार चेतना पाटील यांचा मंत्रालयात सन्मान

मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही अल्पवयीन बालिका मुंबईतील अतिगर्दीच्या परिसरात हरविल्यानंतर, आझाद मैदान पोलीस स्टेशनच्या महिला सहाय्यक फौजदार चेतना पाटील व त्यांच्या पथकाने अवघ्या एका तासात तिचा शोध घेऊन तिला सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात दिले. या उल्लेखनीय कार्याबद्दल आज मंत्रालयात राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

मंत्रालयातील पर्यटन मंत्र्यांच्या दालनात आयोजित कार्यक्रमात चेतना पाटील यांना प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. ही घटना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) या अतिगर्दीच्या आणि विस्तीर्ण रेल्वे स्थानक परिसरात घडली होती. दररोज लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या या ठिकाणी हरविलेल्या बालिकेचा अल्पावधीत शोध घेणे अत्यंत आव्हानात्मक होते. मात्र, पाटील व त्यांच्या पथकाने दाखविलेली तत्परता, समन्वय आणि अचूक दिशेने तपास यामुळे हे शक्य झाले.

यावेळी मंत्री शंभूराज देसाई म्हणाले की, “मुंबईत येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणेने दाखविलेली तत्परता व संवेदनशीलता अत्यंत प्रशंसनीय आहे. पर्यटकांचा सुरक्षिततेवरील विश्वास अबाधित राखण्यासाठी अशा प्रकारचे कार्य महत्त्वपूर्ण आहे. चेतना पाटील व त्यांच्या पथकाची कामगिरी संपूर्ण पोलीस दलासाठी प्रेरणादायी आहे.”

हरवलेल्या बालिकेचा तासाभरात शोध घेऊन तिला सुरक्षितपणे पालकांच्या ताब्यात देणे ही कर्तव्यदक्षतेची उत्कृष्ट जाणीव असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच, चेतना पाटील यांच्या नावाची विशेष प्रशस्ती व गौरवासाठी गृह विभागाकडे शिफारस करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रात येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांना सुरक्षित, विश्वासार्ह व सकारात्मक वातावरण उपलब्ध करून देणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून, पर्यटन स्थळे व गर्दीच्या ठिकाणी सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी पोलीस यंत्रणा, स्थानिक प्रशासन व संबंधित विभागांमध्ये प्रभावी समन्वय साधला जात आहे.

अशा सकारात्मक उपक्रमांमुळे पोलीस दलाचे मनोबल वाढण्यासोबतच महाराष्ट्राची ‘सुरक्षित पर्यटन राज्य’ म्हणून ओळख अधिक बळकट होण्यास मदत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

11 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

11 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

11 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

11 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

11 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

11 तास ago